Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वकिलावर पुन्हा प्राणघातक हल्ला, हल्लेखोरास गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी…
गुन्हेगारी

अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वकिलावर पुन्हा प्राणघातक हल्ला, हल्लेखोरास गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी…

दुसऱ्यांदा झालेल्या हल्ल्याने नगर हादरले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, दिनांक ९ मे

अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा वकिलावर प्राणघातक हल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी दुपारी साडेचार वाजता जुन्या कोर्टाजवळ लोणी हवेली (ता. पारनेर) येथील वकील अशोक कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा राबवत गुन्हा दाखल करण्यापूर्वीच हल्लेखोरास पकडण्यात यश मिळविले असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली आहे.

अधिक माहिती अशी, ॲड. मयूर अशोक कोल्हे हे आपल्या वकील असलेल्या वडिलांसह न्यायालयीन कामकाजानिमित्त लोणी हवेली (ता. पारनेर) येथून अहमदनगरला आले होते. ॲड. अशोक कोल्हे अहमदनगरमधील जुन्या न्यायालयाजवळ असताना दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास काही एक कारण नसताना त्यांचा पक्षकार अनिल गायकवाड यांने “तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून हातात धारदार शस्त्र घेत वकिलावर धावून जात त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला” या हल्ल्यात वकील कोल्हे यांच्या डाव्या गालावर तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर नगरच्या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पक्षकार तिथून पसार झाला होता.

दरम्यान वकिलावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समजताच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना कोणत्याही परिस्थितीत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचा सूचना दिल्या. गुन्हे शोध पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार, सुरज कदम, सुजय हिवाळे यांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली तसेच रुग्णालयात जात घडलेल्या घटनेचा तपशील जाणून घेतला.

अनिल लक्ष्मण गायकवाड (रा. बोल्हेगाव, अहमदनगर) या रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच कोल्हे यांच्या पक्षकारानेच हा हल्ला केल्याचे समोर आल्यानंतर त्याला पकडण्यासाठी शोध सुरू केला. कोल्हे यांच्यावरील हल्ल्याचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.

कोतवाली पोलीस ठाण्यात ॲड. मयूर कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम ३०७, ५०४, ५०६ आर्म ॲक्ट ४/२५ सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम ७ प्रमाणे गुरुवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,076
अहमदनगर हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – कर्जत येथील सोनारगल्लीतील ‘ओम ज्वेलर्स’ हे दुकान फोडून…

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.