Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहमदनगर व शिर्डीमध्ये झाले इतके टक्के मतदान, प्रमुख पाच उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद; शिर्डी, नगरचे खासदार ४ जूनला ठरणार!
राजकारण

अहमदनगर व शिर्डीमध्ये झाले इतके टक्के मतदान, प्रमुख पाच उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद; शिर्डी, नगरचे खासदार ४ जूनला ठरणार!

नगर-शिर्डीकरांचा कौल कोणाला?
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 13, 2024Updated:May 13, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, दि. १३ मे 

सोमवारी राज्यात अकरा लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले. यात प्रामुख्याने अहमदनगरमध्ये ६१% तर शिर्डीमध्ये ६२% टक्के सरासरी मतदान झाल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान अहमदनगर येथे किरकोळ वादातून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे मतदाराने ईव्हीएमवरील मतदानाचे चित्रीकरण केल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला तर राहाता तालुक्यातील कोल्हार येथे निळया रंगाच्या शाईची बाटली घेऊन अवैधरित्या शाई लावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणुकी दरम्यान अशा किरकोळ घटना वगळता अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान शांततेत पार पडले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सालीमठ यांनी दिली.

दरम्यान अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या सरळ लढत झाली आहे. राज्यातील अटीतटीची लढत म्हणून या लढतीकडे पाहिले जात आहे.

याशिवाय शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे, महाविकास आघाडीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांच्या तिरंगी लढत झाली. शिर्डी आणि अहमदनगर मधील या पाच प्रमुख उमेदवारांसह अन्य उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून मतदारांनी आपला खासदार म्हणून कोणाला कौल दिला हे ४ जूनला मतमोजणीनंतर समजणार आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,283
अहमदनगर लोकसभा मतदान लोकसभा निवडणूक शिर्डी लोकसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

By अनंत पांगारकरJune 12, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ​मुंबई | विशेष प्रतिनिधी: राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध…

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.