Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाचखोरीचा कळस | नायब तहसीलदार, नगराध्यक्ष, बांधकाम समिती सभापती, नगरसेवकासह ६ जण लाच लुचपतच्या सापळ्यात; गुन्हा दाखल
गुन्हेगारी

लाचखोरीचा कळस | नायब तहसीलदार, नगराध्यक्ष, बांधकाम समिती सभापती, नगरसेवकासह ६ जण लाच लुचपतच्या सापळ्यात; गुन्हा दाखल

अधिकाऱ्यासह अर्धा डझन पदाधिकाऱ्यांचा समावेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, दि. १५ मे

बांधकाम कार्यारंभ आदेश देण्यापूर्वीच १५ टक्क्यांप्रमाणे १ लाख ८२ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मुख्याधिकारीपदाचा पदभार असलेल्या नायब तहसीलदारासह नगराध्यक्ष, बांधकाम समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविकाचा पती आणि एका व्यापाऱ्यावर लाचलुचपत विभागाने मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या यांचा आहे समावेश… गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी नगरपंचायतीमध्ये लाचखोरीचा हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगरपंचायतीची कामे घेणाऱ्या ठेकेदाराच्या वडिलांनी गोंदिया लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. तेजराम किसन मडावी (वय ६६ वर्ष, नगराध्यक्ष), सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार असलेले नायब तहसीलदार शरद विठ्ठल हलमारे (वय ५६ वर्ष), नगरपंचायतीच्या बांधकाम समितीचे सभापती आश्लेष मनोहर अंबादे (वय ३५ वर्षे), नगरसेवक महेंद्र जयपाल वंजारी (वय ३४ वर्ष), नगरसेविका राजू शेख हिचा पती खासगी इसम जुबेर अलीम शेख व व्यापारी शुभम रामकृष्ण येरणे (वय २७ वर्ष) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी लोकसेवकांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी, भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथील तक्रारदाराच्या मुलाने सडक-अर्जुनी नगरपंचायतीच्या नाला बांधकामाचा ठेका घेतला होता. नगरपंचायत सडक-अर्जुनी अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान सन २०२३-२४ लेखाशीर्ष (२२१७१३०१) या योजनेअंतर्गत दोन नाली बांधकामाच्या ई-निविदा संबंधित ठेकेदाराला मंजूर झाल्या होत्या.

ठेकेदाराने त्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षा रक्कम भरली होती. या कामाचा कार्यारंभ आदेश मिळविण्यासाठी ठेकेदाराने मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांची भेट घेतली असता नगराध्यक्षांनी निविदा रकमेच्या १५ टक्के लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने गोंदिया लाच लुचपत विभागाशी संपर्क करत तक्रार नोंदविले होती.

लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदाराने कार्यारंभ आदेश मिळविण्यासाठी प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार शरद हलमारे यांची भेट घेतली असता त्यांनी नगराध्यक्ष तेजमल मडावी यांची भेट घेण्यास सांगितले. नगराध्यक्षांच्या भेटीनंतर त्यांनी तक्रारदाराकडे १२ लाख १५ हजार ६३४ रुपयांच्या निविदेकरिता १५ टक्के प्रमाणे १ लाख ८२ हजार रुपये लाचेची मागणी केली. अन्य आरोपींनी या लाच मागणीस प्रोत्साहन दिले. नगराध्यक्ष मडावी यांनी लाचेचे रक्कम सडक-अर्जुनीच्या शुभम रामकृष्ण येरणे याच्याकडे देण्यास सांगितले होते.

शुभम रामकृष्ण येरणे याने लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर या सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई… पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम व संजय पुरंदरे, पोलीस उपाधीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल पवार व उमाकांत उगले, सहाय्यक फौजदार चंद्रकांत करपे, पोलीस हवालदार संजयकुमार बोहरे, मंगेश कहालकर, पोलीस शिपाई संतोष शेंडे, संतोष गोपचे, अशोक कापसे, महिला पोलीस शिपाई संगीता पटले, चालक दीपक बाटबर्वे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,509
लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar19/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक राहील. कार्यक्षेत्रात नवीन संधी…

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.