Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; दर्शन घेऊन परतणारे बोटा येथील ५ भाविक गंभीर जखमी

June 11, 2026

आज गुरुवार, ११ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 11, 2026

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बीडच्या लाचखोर पोलीस निरीक्षकाच्या घरी एक कोटीच्या रोख रकमेसह सापडले एवढे घबाड! ऐकून तुम्हीही व्हाल थक्क…
गुन्हेगारी

बीडच्या लाचखोर पोलीस निरीक्षकाच्या घरी एक कोटीच्या रोख रकमेसह सापडले एवढे घबाड! ऐकून तुम्हीही व्हाल थक्क…

गृहमंत्र्यांचा पोलीस दलावरील अंकुश सैल झाला की काय? अधिकारी मागतात कोटीची खंडणी!
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 17, 2024Updated:May 17, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, दि. १७ मे

एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घरी केलेल्या कारवाईत अँटीकरप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठं घबाड सापडल आहे. यात एक कोटी रुपयांची रोख रक्कम आणि ९७० ग्रॅम सोने आणि ५ किलो चांदीचा समावेश आहे.

पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या लाचखोरीच्या या प्रकरणात आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घराची अँटी करप्शन विभागाकडून (ACB) झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये खाडे यांच्या घरातून एक कोटी आठ लाख रुपयांची रोकड, ९७० ग्रॅम सोने व पाच किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खाडे याच्या नावावर पाच ते सहा ठिकाणी असलेल्या मालमत्तांची कागदपत्रेही यावेळी पोलिसांच्या हाती लागली आहेत.

एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील प्रमुख आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे व सहाय्यक फौजदार रविभूषण जाधवर हे फरार झाले आहेत.

Advt

काय आहे प्रकरण…

बीड शहरातील जिजाऊ मल्टीस्टेट सहकारी बँकेमध्ये गतवर्षी १०० कोटीचा घोटाळा झाला होता. याप्रकरणी प्रमुख बबन शिंदे तसेच अध्यक्ष अनिता शिंदे यांच्यासह चार जणांवर गुन्हे दाखल झाले होते. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या हरिभाऊ खाडे यांच्याकडे होता. याच प्रकरणांमध्ये आरोपी बबन शिंदे यांनी दोन व्यावसायिकांना बांधकामाचे साहित्य पुरवल्यापोटी ६० लाख रुपये दिले होते. त्यामुळे या दोन्ही व्यावसायिकांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू होती. याच गुन्ह्यामध्ये आरोपी करण्याची भीती दाखवून पीआय खाडे यांनी या दोघांकडे ५० लाख, अशी एकूण एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. अखेर ३० लाखात तडजोड झाली होती. यातील पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता देत असतानाच खासगी व्यापारी कुशाल जैन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चार महिन्यांपासून खाडे हे त्यांना त्रास देत होते. अखेर १३ मे रोजी रात्री उशिरा बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. त्यानंतर १४ मे रोजी खात्री केली. १५ मे रोजी पैसे घेऊन तक्रारदार खाडे यांच्याकडे गेला होता. यावर खाडे याने आपण पुण्याला आलो असून जैन या व्यापाऱ्याकडे पैसे देण्यास सांगितले. जैनने पैसे स्विकारताच अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडले. त्यानंतर खाडे आणि हवालदार जाधवर यांचा शोध सुरू केला. 

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,515
बीड लाच लुचपत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

पाच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह सात जणांना अटक

June 8, 2026

राजूर ‘फेक मर्डर केस’ : दोन पोलीस निरीक्षक निलंबित, DGP सदानंद दाते आढावा बैठक घेण्याची शक्यता

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; दर्शन घेऊन परतणारे बोटा येथील ५ भाविक गंभीर जखमी

By अनंत पांगारकरJune 11, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन घारगाव (संगमनेर): कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील गुळंजवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत बुधवारी…

आज गुरुवार, ११ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 11, 2026

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.