Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्थेपाठोपाठ आता या मल्टीस्टेटच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी पोलिसात ठेवीदारांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल! बँका, पतसंस्था लुटण्याचे जिल्ह्यात कारस्थान सुरूच
गुन्हेगारी

दूधगंगा पतसंस्थेपाठोपाठ आता या मल्टीस्टेटच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी पोलिसात ठेवीदारांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल! बँका, पतसंस्था लुटण्याचे जिल्ह्यात कारस्थान सुरूच

लाचखोरीचे प्रकरण समोर आल्याने तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह!...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/05/2024Updated:17/05/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अनंत पांगारकर | शुक्रवार, दि. १७ मे 

संगमनेरच्या आर्थिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थे पाठोपाठ आता अहमदनगरमधील ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेडचा मोठा आर्थिक घोटाळा समोर आला आहे. ठेवीवर मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आमिष दाखवून ११२ ठेवीदारांची सुमारे सहा कोटी फसवणूक केल्याप्रकरणी नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात संस्थेच्या अध्यक्षासह सात संचालकांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींमध्ये ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेड चा अध्यक्ष विशाल लक्ष्मण भागानगरे (रा. पंचपीरचावडी, माळीवाडा, अहमदनगर) याच्यासह उपाध्यक्ष रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहररोड, सावेडी, अहमदनगर), संचालक सीईओ राहुल बबन कराळे (रा. टोकेवाडी, ता. अहमदनगर), संचालक निलेश शिवाजी फुंदे (रा. राजलक्ष्मी सेंटर, सावेडी, अहमदनगर), संचालक गणेश कारभारी कराळे (रा. आगडगाव, ता. नगर, जि. अहमदनगर), संचालक पूजा विलास रावते व संचालक विलास नामदेव रावते (दोघे, रा. बोरुडेमळा, सावेडी, अहमदनगर) यांचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये समावेश आहे.

सुजाता संदीप नेवसे (रा. शोभा कॉलनी, शिंदेमळा, सावेडी, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १ डिसेंबर २०२२ रोजी ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेड या संस्थेच्या पाईपलाईन रोडवरील शाखेत दोन लाख रुपयांची मुदत ठेव ठेवली होती. मुदतीनंतर तक्रारदार महिलेने शाखेच्या बालिकाश्रम रोडवरील मुख्य शाखेत ठेवीचे पैसे मिळण्यासंदर्भात चौकशी केली असता अध्यक्ष विशाल भागानगरे यांनी “सध्या आमच्याकडे पैसे नाहीत, कर्ज प्रकरणांचे पैसे जमा झाले की तुम्हाला बोलावून घेऊ व तुमची रक्कम परत देऊ” असे सांगितले. त्यानंतरदेखील तक्रारदाराने वारंवार चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

तक्रारदाराने त्यानंतर व्यवस्थापकाकडे चौकशी केली असता अध्यक्षसह संचालक मंडळातील कोणीही संस्थेत येत नसल्याची व संस्था बंद झाल्याची माहिती समजली. त्यामुळे तक्रारदार महिला व इतर ठेवीदार साक्षीदारांची फसवणूक केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात धाव घेत दाखल केली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात संस्थेचे अध्यक्षसह संचालकांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ६१३/२०२३ प्रमाणे भा.द.वि.क ४२०, ४०६, महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ कलम ३ व ५ प्रमाणे अध्यक्ष व संचालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नगर शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे तपास करीत आहेत.

लाचखोरीचे प्रकरण समोर आल्याने तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह!…

संगमनेरच्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था तब्बल ८२ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रमुख आरोपी असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटेसह त्याच्या कुटुंबातील सदस्य नातेवाईकांना जिल्हा न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने जामीन नाकारून देखील अद्याप नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अटक करू शकले नाहीत. जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या नगर अर्बन बँकेतील घोटाळ्याप्रकरणी देखील अद्याप तपासाला वेग येताना दिसत नाही. १०५ पैकी काही मोजक्याच आरोपींपर्यंत पोलीस पोहोचू शकले आहे. त्यातच बीड मधील जिजाऊ मल्टीस्टेट बँकेच्या शंभर कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी तपास अधिकारी असलेल्या पोलीस निरीक्षकाने एक कोटी रुपयांची लाच मागितल्याचे प्रकरण समोर आले आहे. कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने जिल्ह्यात आर्थिक गुन्हेगारांचे फावत असल्याचे व तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसते.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,637
अहमदनगर दूधगंगा पतसंस्था ध्येय मल्टीस्टेट पतसंस्था अपहार संगमनेर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.