Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी संगमनेर पोलिसांनी पकडली, घाटात दरोडा टाकून लूटमार करणार होते
गुन्हेगारी

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी संगमनेर पोलिसांनी पकडली, घाटात दरोडा टाकून लूटमार करणार होते

आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, दि. १८ मे

दुचाकीसह दागिने चोरांनी पोलीस यंत्रणेला भंडावून सोडले असतानाच ११२ क्रमांकावर आलेल्या फोनच्या माध्यमातून संगमनेर पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे दरोड्याच्या तयारीत असलेली गुन्हेगारांची टोळी पोलिसांच्या हाती लागले. टोळीतील तिघांना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले असले तरी सहा जण मात्र पळून गेले आहे. संगमनेरच्या आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार समोर आला.

संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पानोडी ते वरवंडी दरम्यान असलेल्या घाटात एम.एच. १७ सी.व्ही. १०८४ या क्रमांकाचा मालवाहू टेम्पो आणि त्यात असलेल्या नऊ लोकांकडे लोखंडी कटावणी, कटर, कुऱ्हाड, लाकडी दांडे, दोरी, मिरची पावडर असे साहित्य असून संबंधित व्यक्ती चोर असल्याचा संशय व्यक्त करणारा फोन पोलिसांच्या ११२ क्रमांकावर आला होता.

त्यामुळे पोलीस पथकाने तातडीने मिळालेल्या माहितीच्या आधारे खात्री केली असता पोलिसांना घाटामध्ये संशयास्पदरित्या दबा धरून बसलेली टोळी आढळून आली. पोलिसांना बघतात त्यातील काहीजण पळून गेले तर तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी त्यांच्याकडून मालवाहू टेम्पोसह दरोड्यासाठी आवश्यक असणारे साहित्य ताब्यात घेतले. नऊ आरोपींची नावे पोलिसांनी निष्पन्न केले असून यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. पोलिसांनी पकडलेले आरोपी घाटात वाहनावर दरोडा टाकून लूटमार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते.

या संदर्भात आश्वी पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार बाबासाहेब पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका अल्पवयीन मुलासह आकाश सुनील पाळंदे, रोहित भिरू मुळेकर (तिघे रा. दाढ बुद्रुक, ता. राहता) यांना ताब्यात घेतल्या असून या तिघांसह सिद्धू मकवाने (रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता), कादिर (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) व शरद उर्फ गोटया हरिभाऊ पर्बत (रा. दाढ खुर्द, ता. संगमनेर यांच्यासह अन्य तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,522
आश्वी पोलीस सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शेतकी सहकारी संघ ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची…

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.