रविवार, दि. १९ मे
छात्रभारतीच्या विद्यार्थी संघटनेच्या संगमनेर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वरी सातपुते, कार्याध्यक्षपदी मोहम्मद कैफ तांबोळी यांची निवड करण्यात आली.
संघटनेची अन्य कार्यकारिणी पुढील प्रमाणे…
सुरेश गाडे (तालुका संघटक), सुहानी गुंजाळ (तालुका उपाध्यक्ष), निकिता शिंदे (तालुका युवती संघटक), सुमित खरात, आकांक्षा जमधडे (तालुका सदस्य), अपेक्षा गुंजाळ (अभ्यास मंडळ प्रमुख), श्रेया शिंदे (सह्याद्री कॉलेज अध्यक्ष)
छात्रभारतीचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर साथी भास्कर दुर्वे नाना स्मारक या ठिकाणी पार पडले. येथे या निवडी करण्यात आल्या. प्रा. तुळशीराम जाधव, डॉ. सागर भालेराव, राजाभाऊ अवसक, अनिकेत घुले यांनी यावेळी सर्वांना मार्गदर्शन केले.
छात्रभारतीचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, कृष्णामाई जाधव, राज्य सहसंघटक गणेश जोंधळे, राज्य सदस्य विशाल शिंदे, तुषार पानसरे, जिल्हा अध्यक्ष राहुल जऱ्हाड, माजी तालुकाध्यक्ष तृप्ती जोर्वेकर आदी यावेळी उपस्थित होते.


