Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दरोड्याच्या तयारीत असलेली चौघांची टोळी पकडली तर दोघे पळून जाण्यात यशस्वी! टोळीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा समावेश
गुन्हेगारी

दरोड्याच्या तयारीत असलेली चौघांची टोळी पकडली तर दोघे पळून जाण्यात यशस्वी! टोळीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा समावेश

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, दि. २५ मे 

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या सहा जणांच्या टोळीतील चौघांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रात्री यश आले असून उर्वरित दोघेजण मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले. पथकाने पकडलेले चौघे आणि पळून गेलेले दोघे सराईत गुन्हेगार आहे.

ओसवाल इंपिरियअल चव्हाण (वय २८ वर्षे, रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर), डेग विठ्ठल भोसले (वय २९ वर्षे, रा. आनंद चिखली, ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर), तुषार उर्फ नुटल्या इंपिरिअल भोसले (वय ३३ वर्षे, रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर), व नागेश रेजा काळे (वय २५ वर्षे, रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर) अशी पोलीस पथकाने पकडलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत. तर पळून गेलेल्या असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे पळुन गेलेल्यामध्ये अजय विलास चव्हाण व कान्ह्या उर्फ कानिफ उध्दव काळे (दोघे रा. हातवळण, ता. आष्टी, जिल्हा बीड) यांचा समावेश आहे.

ओसवाल इंपिरियल चव्हाण (रा. वाळुंज पारगाव, ता. जि. अहमदनगर) हा सराईत गुन्हेगार आपल्या चार ते पाच साथीदारांसोबत दोन दुचाकींवर नगरमध्ये आला असून तो कल्याण-केडगाव रस्त्यावरील लिंक रोड जवळील गायके मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबून अंधाराचा फायदा घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना २४ मे रोजी मिळाली होती.

त्यांनी याची माहिती आपल्या पथकाला देत कारवाई करण्यासाठी पाठविले. या पथकामध्ये गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार बबन मखरे, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, बापूसाहेब फोलाणे, रवींद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, संदीप दरंदले, संतोष खैरे, विजय ठोंबरे, रविंद्र घुंगासे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर यांचा समावेश होता.

पथकाने घटनास्थळी जात पाहणी केली असता त्यांना रस्त्याच्या कडेला ओढ्यालगत संशयित दबा धरून बसले असल्याचे दिसले. पथक त्यांना पकडण्याच्या तयारीत असतानाच पथकाची चाहूल लागल्याने अंधाराचा फायदा घेऊन संशयित पळू लागले. पथकाने पाठलाग करत त्यातील चौघांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या संशयीतांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे १ तलवार, १ सुरा, लोखंडी कटावणी, मिरचीची पूड, दोन महागडे मोबाईल, दोन मोटार सायकल असा २ लाख १२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. कोतवाली पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कचरू पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीं विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ६२२/२०२४ नुसार भारतीय दंड विधान कलम ३९९, ४०२ सह आर्म ॲक्ट ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,213
अहमदनगर एलसीबी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.