Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ८१ कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी दूधगंगा पतसंस्थेचा चेअरमन, प्रमुख आरोपी भाऊसाहेब कुटेच्या कोठडीबाबत न्यायालयाने घेतला हा निर्णय…
न्यायालय

८१ कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी दूधगंगा पतसंस्थेचा चेअरमन, प्रमुख आरोपी भाऊसाहेब कुटेच्या कोठडीबाबत न्यायालयाने घेतला हा निर्णय…

ठेवीदार चिंतेत...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/05/2024Updated:30/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, दि. २९ मे | अनंत पांगारकर

तब्बल नऊ महिने फरार राहिलेला दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपल्यानंतर त्याला संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने १३ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. कुटेला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याच्याकडून जामीन अर्ज दाखल होण्याची शक्यता निर्माण झाल्याने ठेवीदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

दूधगंगा पतसंस्थेचा संस्थापक चेअरमन असलेल्या भाऊसाहेब कुटेसह २१ जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ८१ कोटीच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून कुटे फरार होता. याच गुन्ह्यात त्याच्या कुटुंबियांना थेट सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर २४ मे रोजी कुटे स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्यानंतर न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली होती.

बुधवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर कुटेला संगमनेरचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप घुमरे यांच्यासमोर आणण्यात आले होते. या गुन्ह्यातील बहुतांशी तपास पूर्ण झाल्याने तपास अधिकाऱ्यांनी पोलीस कोठडीऐवजी कुटेला १४ दिवस न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य केल्याने आता कुटेची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.

दरम्यान गेल्या वेळी प्रमुख सूत्रधार आरोपी असलेल्या कुटेला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. याच दरम्यान आरोपी कुटेच्यावतीने वैद्यकीय सुविधा मिळावी, औषधे उपलब्ध व्हावी, घरचे जेवण मिळावे यासाठी न्यायालयात अर्ज दिला होता. सहाय्यक सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी या अर्जाला जोरदार हरकत घेत आरोपीने वैद्यकीय कागदपत्रे न्यायालयाला दिली नसल्याचे निदर्शनास सांगून दिले. यावर न्यायालयाचा निर्णय येणे बाकी आहे.

जामीन अर्ज दाखल होण्याची शक्यता…

दरम्यान न्यायालयाने प्रमुख आरोपी भाऊसाहेब कुटे याला न्यायालयीन कोठडी दिली असल्याने येत्या एक-दोन दिवसात आरोपी कुटे याच्याकडून जामीन अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गुन्ह्यातील व्यवस्थापक वगळता बहुतांशी आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर कुटे कुटुंबियासह कदम व अन्य काही आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व उच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळून लावले आहेत.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 22,196
आर्थिक गुन्हे शाखा दूधगंगा पतसंस्था भाऊसाहेब कुटे संगमनेर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात वेगवेगळ्या मुद्यांवरून श्रेय लाटण्याचे प्रकार सुरू असताना, जिल्ह्यात आता निळवंडेच्या…

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.