Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मला फाशी दिली तरी चालेल, पण मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या… आमदार जितेंद्र आव्हाड
राजकारण

मला फाशी दिली तरी चालेल, पण मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या… आमदार जितेंद्र आव्हाड

वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार आव्हाड स्पष्टच बोलले...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/05/2024Updated:30/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, दि. ३० मे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीतून अडचणीत सापडले असतानाच “मला फाशी दिली तरी चालेल, पण मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या विरोधात उभा राहणार आहे”, अशा स्पष्ट शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मनुस्मृती दहन करत असतानाच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली, मात्र तरीदेखील सत्ताधारी पक्षाकडून याप्रकरणी रान उठवलं गेलं. सत्ताधाऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं करून अनेक पातळीवर आव्हाडांचा विरोध सुरू ठेवला आहे.

या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून ते म्हणाले की, मी काल महाडला गेल्यावर मला खरा इतिहास कळला. ज्या कुटुंबानी बाबासाहेब आंबेडकरांना पाठींबा दिला होता, तेव्हा सनातन्यांनी त्यांच्या घरांवर १० वर्षे बहिष्कार घातला. बाबासाहेब जेव्हा रायगडावर गेले तेव्हा तिथल्या सनातन्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. तिथे याचे साक्षीदार आहेत. यानंतर आता मनुस्मृती जाळणार हे कळल्यावर सनातन्यांनी दम देत जागा देऊ नका असे धमकावले.

जागा देणाऱ्या मुस्लिम व्यक्तीलाही त्यांनी विरोध केला. ९७ वर्षांनी त्याच जागी मनुस्मृती जाळली गेली. त्यावेळी आमच्याकडून चूक झाली आणि गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता मला फाशी द्या, पण मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या विरोधात उभा राहणार आहे. स्त्री द्वेषाची बिजे रोवणाऱ्या मनुस्मृतीस माझा विरोध असणार आहे. मनुस्मृतीमध्ये स्त्री कोणत्याही जाती-वर्णाची असो, ती अत्यंत खालची आहे, त्यामुळे तिचा वापर उपभोगाची वस्तू म्हणून वापरा, असं म्हणणारा मनु मला मान्य नाही.

मला आई आहे आणि माझ्या आईला असं म्हणणं मला मान्य नाही. मराठी साहित्यात म्हटल्याप्रमाणे एका क्षणाची पत्नी अनंत काळाची माता असते. त्या मातेबद्दल लिहिणं कुठल्या माणसाला मान्य आहे? माझ्या हातून चूक झाली, त्याबद्दल मी बोलायचं ते बोललो. आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या सर्व स्तरातील माणसांची मी माफी मागितली आहे.

भाजपा हा माझा वैचारिक शत्रू आहे. त्यांच्यात आणि माझ्यात मनुस्मृती, जातीपातीच्या राजकारणामुळे, धर्माच्या राजकारणामुळे वैचारिक मतभेद आहेत. शरद पवार यांची जी भूमिका आहे, तीच माझी भूमिका आहे आणि आयुष्यभर तीच माझी भूमिका राहिलं. राहिला प्रश्न मनुस्मृती वादाचा, तर मनुस्मृतीमध्ये शुद्राचं निर्माण झालं आहे.

कोश्यारी यांनी महात्मा फुले यांच्याबद्दल बोलल्यावर माफी मागितली होती का? चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी महाराजांबद्दल बोलल्यावर माफी मागितली होती का? पण त्यांना बोलायला कोण भाजपावाले गेले नाहीत, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 752
जितेंद्र आव्हाड
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.