Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिकच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल, यांचा आहे समावेश…
राजकारण

नाशिकच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल, यांचा आहे समावेश…

नाशिकमध्ये लढत रंगणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, दि. ३१ मे

नाशिक विभागाच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेला शुक्रवारी सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी नगर जिल्ह्यातील दोघा उमेदवारांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक बिपिनदादा कोल्हे यांनी दोन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. याशिवाय डॉ. छगन भिकाजी पानसरे यांनी देखील हिंदुस्तान जनता पार्टी कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

विधान परिषदेच्या नाशिकसह चार जागांसाठी २६ जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी ७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली.

१० जून रोजी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १२ जूनची मुदत आहे. त्यानंतर या जागेसाठी २६ जून रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत मतदान होणार असून १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

नाशिक विभागात नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश असून या मतदारसंघातून गेल्यावेळी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार किशोर दराडे निवडून गेले होते. येत्या ७ जुलैला त्यांची मुदत संपत असल्याने या जागेसाठी निवडणूक होत आहे. दराडे हे देखील पुन्हा इच्छुक असून सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते.

शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणारे विवेक कोल्हे भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असले तरी त्यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले असून हे दोन्ही अर्ज अपक्ष आहेत.

विवेक कोल्हे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा संघर्ष सर्वश्रुत असल्याने भाजपकडून या जागेवर विवेक कोल्हेना संधी मिळते की ऐनवेळी दुसरा उमेदवार दिला जातो, हे लवकरच समोर येणार आहे.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,045
उमेदवारी अर्ज नाशिक शिक्षक मतदार संघ विवेक कोल्हे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.