Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘गाढवाचं लग्न’मधील गंगी काळाच्या पडद्याआड, लोक कलावंत प्रभा शिवणेकर यांचे निधन
महाराष्ट्र संवाद विशेष

‘गाढवाचं लग्न’मधील गंगी काळाच्या पडद्याआड, लोक कलावंत प्रभा शिवणेकर यांचे निधन

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/06/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, दि. १ जून 

‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यातून सर्व परिचित झालेल्या, आपल्या कारकिर्दीत १०० हून अधिक भूमिका साकारणाऱ्या लोक कलावंत प्रभा शिवणेकर यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यानच शुक्रवारी (दि. ३१ मे) त्यांची प्राणज्योत मालवली.

अविवाहित असलेल्या प्रभा शिवणेकर आपल्या बहीण व भावांबरोबर राहायच्या. त्यांच्या भावंडांनीच त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ केला. ‘गाढवाचे लग्न’ या वगनाट्यात त्यांनी गंगीची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. या नाटकाला केंद्र सरकारचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. संगीत नाट्य अकादमीने त्यांना १९७४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपतीच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले. तर राज्य शासनाने विठाबाई नारायणगावकर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. तर प्रभा शिवणेकर यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या ‘एका गंगीची कहाणी’ या चरित्रग्रंथाचे लेखन ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांनी केले.

शिवणेकर यांनी वगसम्राट दादू इंदुरीकर, अभिनय सम्राट शंकरराव शिवणेकर, शाहीर अमर शेख, विठाबाई नारायणगावकर, रघुवीर खेडकर, कांताबाई सातारकर, तुकाराम खेडकर आणि चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्याबरोबर साकार केलेल्या भूमिका अजरामर झाल्या आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,193
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर…

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.