सोमवार, दि. ३ जून
परमपूज्य आचार्य सम्राट राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि परमपूज्य जिन शासन गौरव परमपूज्य सुनंदाजी म. सा. यांच्या प्रेरणेने आश्वी येथील सुशील भंडारी यांची इंजिनीयर कन्या मुमुक्षु कु. प्रतीक्षा ही जैन भगवती दीक्षा घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अर्हमविजाप्रणेता उपाध्याय प्रवर प. पू. श्री. प्रवीणऋषीजी म. सा., प्रखर व्याख्याता प. पू. लोकेशऋषीजी म. सा., मधुरकंठी आतापणा साधक प. पू. तीर्थेशऋषिजी म. सा., उपप्रवर्तिनी साध्वीरत्ना प. पू. संन्मतिजी म. सा., वाणीभूषण प. पू. प्रीतीसुधाजी म. सा., कैवल्यधाम प्रेरक प. पू. कैवल्यरत्नाश्रीजी म. सा., स्वाध्याय प्रेमी प. पू. श्री प्रियदर्शनाची म. सा., मधुरव्याख्याता प. पू. विश्वदर्शनाची म. सा., सतत उद्यमी प. पू. श्री सुचेताजी म. सा., सेवाभावी विदुषी प. पू. कीर्तीसुधाजी म. सा., मधुर व्याख्याता प. पू. सुनिताजी म. सा, मधुर व्याख्याता प. पू. ज्ञानप्रभाजी म.सा, विद्याबिलासी प. पू. सुप्रियाजी म. सा., राजस्थान विरांगणा प. पू. जयश्रीजी म. सा, प्रखर वक्ता प. पू. सुप्रभाजी म. सा., उपप्रवर्तिनी प. पू. चंदनबालाजी म. सा., प्रतिभाशाली प.पू. शुभदाजी म. सा., बुलंदवाणी प. पू. पद्मावतीजी म.सा., अध्ययनप्रेमी प. पू. सुबोधिजी म. सा., सतत उत्साही प. पू. सुवीज्ञाजी म. सा, स्वाध्याय प्रेमी प. पू. सुजिज्ञाजी म.सा., प.पू. भारवीजी म. सा., नवदीक्षिता प. पू. समृद्धीजी म. सा. आदी साधू संतांच्या उपस्थितीमध्ये रविवारी (दि. ९ जून) रोजी सकाळी साडेआठ वाजता हा समारोह होत आहे.
बुधवारी ५ जून रोजी दीक्षा महोत्सवास प्रारंभ होणार असून शनिवारी ८ जून रोजी केशर छाटना, सकाळी साडेआठ वाजता वरघोडा, सायंकाळी साडेसात वाजता भक्ती संध्या (मेहुल रूपडा दर्शीद गादिया), कुमकुम, रक्षाबंधन, मेहंदी असे कार्यक्रम पुढील चार दिवसात होणार आहेत.
दीक्षा समारोहाचे नियोजन श्रावक संघाचे अध्यक्ष सुमतीलालजी गांधी, उपाध्यक्ष ईश्वरलालजी भंडारी, सचिव प्रकाशलालजी मुथा, खजिनदार वसंतलालजी गांधी, संतोषजी भंडारी, किशोर पटवा, योगेश रातडीया, अभिजीत गांधी, दिलीपजी पटवा, किशोरजी पटवा, मिलींदजी बोरा, संजयजी गांधी आदी करत आहेत.
तसेच गौतम गांधी, निलेश रातडीया, नितीन गांधी, निलेश चोपडा, अमित भंडारी, दीपक बोरा, रोहित भंडारी, प्रीतम गांधी, राजेन्द्र भंडारी, समीर गांधी, प्रशांत गांधी, आश्विन मुथा, किरण गांधी, पंकज नाके, मंगेश रासने, पपलेश लाहोटी, बजरंग ढगे, चांगदेव खेमनर आदीसह जैन युवक गेल्या २ महिन्यापासून परिश्रम घेत आहेत.
दीक्षा समारंभासाठी नवकार ग्रुप, युवक मंडळ, महिला मंडळ, बहु मंडळ, कन्या मंडळ, आनंद पाठशाळा, बालक एवम् बालिका मंडळ ,भारतीय जैन संघटना आश्वी (ता. संगमनेर) हे सर्व परिश्रम घेत आहेत, अशी महिती जैन संघाचे निलेश चोपडा व अमित भंडारी यांनी दिली.


