Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महायुतीत बिघाडी, नाशिक वगळता उर्वरित तीन जागांवर भाजपचे उमेदवार जाहीर; विवेक कोल्हेंनी बिघडवले नाशिकचे गणित
राजकारण

महायुतीत बिघाडी, नाशिक वगळता उर्वरित तीन जागांवर भाजपचे उमेदवार जाहीर; विवेक कोल्हेंनी बिघडवले नाशिकचे गणित

नासिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक रंगणार, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/06/2024Updated:03/06/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, दि. ३ जून (अनंत पांगारकर)

लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले असून उद्या मंगळवारी देशभरात मतमोजणी होत आहे. ही रणधुमाळी आटोपत असतानाच राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांवर निवडणूक होत आहे. महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र समोर येत असून नाशिक वगळता उर्वरित तीन मतदारसंघात भाजपने आपले उमेदवार सोमवारी जाहीर केले.

ट्विस्ट… कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघासाठी निवडणूक होत असून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवसाअखेर नासिक पदवीधर मतदारसंघात मोठा ट्विस्ट बघायला मिळत असताना नाशिक वगळता उर्वरित तीन जागांवर भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहे.

यांना संधी… कोकण पदवीधर मतदार संघात भाजपाने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना संधी दिली तर मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार आणि मुंबई शिक्षक मतदार संघात शिवनाथ दराडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र नाशिक शिक्षक मतदार संघाच्या जागेवर मोठा पेच निर्माण झाल्याने महायुती अथवा भाजपने या जागेवरील आपला उमेदवार अद्याप जाहीर केला नाही.

मनसे विरुद्ध भाजप… २६ जून रोजी या चार मतदार संघासाठी निवडणूक होत आहे. लोकसभेची निवडणूक महायुतीने एकत्रित लढविली असली तरी विधान परिषदेच्या या चार जागांवर मात्र त्यांच्यात एकमत झालेल दिसत नाही. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी भाजपाचा विद्यमान आमदार असलेल्या कोकण पदवीधर मतदार संघात यापूर्वीच मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली होती. भाजपा या जागेवर मनसेला संधी देईल असे चित्र असतानाच आता भाजपाने कोकण पदवीधर मतदारसंघातून पुन्हा निरंजन डावखरे यांना संधी दिल्याने येथील लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

असा रंगणार सामना… दुसरीकडे मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजपने किरण शेलार यांना उमेदवारी दिली असून त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या अनिल परब यांच्याशी सामना करावा लागणार आहे. तर मुंबई शिक्षक मतदार संघातून भाजपने संधी दिलेल्या शिवनाथ दराडे यांना ठाकरे गटाच्याच ज. मो. अभ्यंकर यांच्याशी लढावे लागणार आहे.

नाशिक वगळता या तीन मतदारसंघात भाजपने जाहीर केले उमेदवार

नासिकमध्ये कोल्हेंनी वाढविली डोकेदुखी…

नासिक शिक्षक मतदार संघातून सुरुवातीलाच भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र भाजप नेते विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर या मतदारसंघात विद्यमान आमदार असलेल्या ठाकरे गटाच्या किशोर दराडे यांना शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी नाकारत ॲड. संदीप गुळवे यांना उमेदवारी दिले आहे. याशिवाय सोमवारी राज्यातील भाजपचे मातब्बर नेते आणि राज्याचे महसूल मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे कोल्हे आणि विखे हे भाजपाचे दोन प्रबळ उमेदवार एकमेकांसमोर ठाकले आहेत. विद्यमान आमदार किशोर दराडे हे देखील शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांची देखील उमेदवारी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे ही जागा शिंदे गटाकडे जाते की भाजपकडे हे देखील लवकरच समजेल. या जागेवर देखील महायुतीचे भवितव्य अवलंबून असेल. मात्र सद्यस्थितीत तरी या मतदारसंघात विवेक कोल्हे डॉ. राजेंद्र विखे ॲड. संदीप गुळवे आणि विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्यात सामना रंगण्याची चिन्ह आहेत.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,179
उमेदवार नाशिक शिक्षक मतदार संघ भाजप राजेंद्र विखे विवेक कोल्हे संदीप गुळवे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.