बुधवार, दिनांक ५ जून २०२४
लोकसभा निवडणुकीचा उत्सव संपला आहे. येता काही दिवसात देशात नवे सरकार सत्तारूढ होईल. दरम्यान नासिकसह चार विधान परिषद मतदार संघाची निवडणूक येत्या २६ जूनला होत आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी मतदानाच्या वेळेत बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी मतदानाची वेळ याआधी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र या वेळेत आता बदल करण्यात आला आहे.
नव्या बदलानुसार आता २६ जूनला मतदान सकाळी ७ वाजता सुरू होणार असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे, अशी माहिती डॉ. गेडाम यांनी दिली आहे.



