Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आता मोदी ‘मोदी सरकार नाही’ तर देशात ‘रालोआ’चे सरकार बनवत आहे : ठाकरे गटाचा मोदींवर निशाणा!
राजकारण

आता मोदी ‘मोदी सरकार नाही’ तर देशात ‘रालोआ’चे सरकार बनवत आहे : ठाकरे गटाचा मोदींवर निशाणा!

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/06/2024Updated:06/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार दिनांक ६ जून २०२४

केंद्रात सरकार बनविण्याइतपत साधे बहुमतही भारतीय जनता पक्षाला यावेळी मिळाले नाही. २४० वरच त्यांचा आत्मा लटकताना दिसत आहे. तरीही नरेंद्र मोदी यांनी बहुमत दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले, मोदी हे आता त्यांच्या ‘ब्रॅण्ड’चे म्हणजे मोदी सरकार बनवत नाहीत तर, त्यांनी ‘रालोआ’चे सरकार बनवत असल्याचे जाहीर करून स्वतःचा पराभव मान्य केला, असे सांगत ठाकरे गटाने मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

अग्रलेखातून टीका – नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपाचा पुरता पचका लोकसभा निवडणुकांच्या निकालात झाला आहे. जनतेने त्यांना जवळ जवळ सत्तेवरून खाली खेचले आहे. ही खेचाखेची करताना जनतेने सभ्यता आणि संस्कृतीचे दर्शन घडवले. त्याचा गैरफायदा मोदी घेत आहेत, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून केला आहे.

असे असेल व्यंगचित्र – ‘मोदी सरकार’, ‘मोदी गॅरंटी’, ‘मोदी है तो मुमकीन है’, ‘मोदी तो भगवान है,’ अशा फेकू कल्पनांना निवडणूक निकालांनी केराची टोपली दाखवली. मोदी यांनी सरकार बनवलेच तर त्यांचे चित्र हे एक व्यंगचित्र असेल. संपूर्ण शरीरभर फॅक्चर आणि प्लॅस्टर लपेटलेले मोदी हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या कुबड्या घेऊन चालत आहेत. त्या कुबड्यांच्या आधारेच त्यांना सरकार चालवावे लागेल. या कुबड्याही अखेरपर्यंत साथ देतील काय याची गॅरंटी नाही, अशी खोचक टीकाही ठाकरे गटाने या अग्रलेखाद्वारे केली आहे.

निकालाने जमिनीवर आणले – लोकसभा निकालांनी मोदी यांना जमिनीवर आणले आणि त्यांनी सांगितले की, ‘माझ्या आईच्या मृत्यूनंतरची ही माझी पहिली निवडणूक आहे.’ चला, अखेर मोदी यांनी मान्य केले की, ते आकाशातील झग्यातून पडले नाहीत, तर त्यांचाही जन्म इतर मर्त्य मानवांप्रमाणे आईच्या कुशीतूनच झाला. मोदी यांना हे असे बोलण्याशिवाय पर्याय नाही. कारण त्यांच्या देवत्वाचा, अवतारगिरीचा आणि बाबागिरीचा मुखवटा खुद्द काशी नगरीतच जनतेने ओरबाडून काढला आहे, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 574
नरेंद्र मोदी सामना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.