Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी “देशातील सर्वात मोठा शेअर बाजार घोटाळा”; काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधींचा गंभीर आरोप
राजकारण

लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी “देशातील सर्वात मोठा शेअर बाजार घोटाळा”; काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधींचा गंभीर आरोप

सरकार स्थापन होण्यापूर्वीच गांधींनी भाजपाला घेरले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/06/2024Updated:06/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले बघा व्हिडिओ
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, दिनांक ६ जून २०२४

येत्या दोन-तीन दिवसात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे (NDA) सरकार स्थापन होण्याचे शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शेअर मार्केट मधील मोठा घोटाळा बाहेर आला आहे. शेअर मार्केटमध्ये देशातील सर्वात मोठा घोटाळा भाजपाने केल्याचा आरोप करत त्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले होते. या सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपला ३०० च्या आसपास जागा दाखविण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये अचानक मोठ्या प्रमाणावर उसळी पाहायला मिळाली होती. मात्र, ४ जूनला निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शेअर मार्केट अचानक कोसळले होते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. यावरून राहुल गांधींनी भाजपाला घेरले आहे.

गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेते राहुल गांधींनी “शेअर मार्केटमध्ये निकालाच्या दिवशी सर्वात मोठा घोटाळा झाला आहे”, असे म्हणत या घोटाळ्याशी संबंधित तीन मुद्दे उपस्थित केले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vy0r_f84X_K6Mp0s.mp4
  • नरेंद्र मोदी, अमित शहा आणि निर्मला सीतारामण यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या पाच कोटी कुटुंबांना विशिष्ट गुंतवणुकीचा सल्ला का दिला? गुंतवणुकीचा सल्ला देणे हे त्यांचे काम आहे का?
  • दोघांच्या मुलाखती एकाच मीडियाला का दिल्या गेल्या? हाच उद्योग समूह जो स्टॉकमध्ये फेरफार केल्याप्रकरणी सेबीच्या चौकशीत आहे.
  • बनावट एक्झिट पोलर्स आणि एक्झिट पोल जाहीर होण्याच्या एक दिवस अगोदर गुंतवणूक करणाऱ्या संशयास्पद विदेशी गुंतवणूकदारांचा काय संबंध आहे? त्यामुळे याची चौकशी करण्यासाठी आम्ही आज संयुक्त संसदीय समितीची मागणी करतो, असे राहुल गांधींनी म्हटले.

ते पुढे म्हणाले, “संपूर्ण भारत या मागचे सत्य जाणून घेऊ इच्छित आहे. खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिमाण झाला. नरेंद्र मोदी, अमित शाह, निर्मला सितारामण यांनी शेअर मार्केटवर टिप्पणी केल्यामुळे आधी मार्केट वरती गेलं आणि ४ जून रोजी मार्केट खाली आलं. यामध्ये ४ तारखेला तब्बल ३० लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले”, असा मोठा दावा राहुल गांधी यांनी केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 682
नरेंद्र मोदी भाजप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राहुल गांधी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

By Annant Ppangarkar10/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: इतर कोणत्याही सत्ता पद्धतीमध्ये स्वातंत्र्याला स्थान नसून ते फक्त…

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.