शुक्रवार, दिनांक ७ जून २०२४
NDA च्या संसदीय दलाच्या बैठकीनंतर दिल्लीत नवे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली वेगात सुरू झाले आहे. एनडीएचे नेते नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची हॅट्रिक साधणार आहे. त्यासाठी ९ जूनची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
पंतप्रधानपदाची शपथ नरेंद्र मोदी रविवारी (९ जून) संध्याकाळी ६ वाजता घेणार असल्याचे निश्चित झाले असून त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या संसदीय दलाच्या बैठकीत संसदीय पक्षाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव राजनाथ सिंह यांनी मांडला होता. या प्रस्तावाला अमित शहा, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, एचडी कुमारस्वामी यांनी अनुमोदन दिले होते.
नितेश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भूमिकेकडे देशभरातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. मात्र या दोन्ही नेत्यांनी एनडीए सोबत जाण्याचा आपला निर्णय कायम ठेवला. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग सुकर झाला आहे.
नव्या सभागृहात आता एनडीएचे २९३, इंडिया आघाडीचे २३३ आणि अन्य सतरा सदस्य असतील.
काँग्रेस पुढच्या दहा वर्षाखाली शंभरचा आकडा पार करू शकणार नाही … नरेंद्र मोदींचा विश्वास
पुढच्या दहा वर्षातही काँग्रेस १०० चा आकडा पार करू शकणार नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला जितक्या जागा मिळाल्या त्या सर्व जागा आम्हाला या एका निवडणुकीत मिळाल्या आहे. इंडिया आघाडी देशातील सामान्य नागरिकांच्या भावना समजू शकले नाहीत. भारताच्या सामान्य लोकांच्या व्यक्तींची काही मत आहेत जे नेते जमिनीशी जोडलेले असतात त्यांना सामान्य नागरिकांच्या भावना समजू शकतात पण ते तिथे कमी पडले मी आशा करतो की ते लोकशाहीचा सन्मान करतील, असे मोदी एनडीएच्या खासदारांच्या बैठकीत म्हणाले.
“आपल्या पक्षाच्या पंतप्रधानाला हे किंमत देत नाहीत. त्यांचे अध्यादेश फाडतात. यांच्या नेत्यांना परदेशातील कार्यक्रमात खुर्ची नसायची. लोकशाही आपल्याला सर्वांचा आदर करायला शिकवते. विरोधी पक्षातही जे खासदार जिंकून आले आहेत, मी त्यांचंही अभिनंदन करतो. गेल्या १० वर्षांपासून मला एका गोष्टीची उणीव जाणवत होती. सखोल चर्चा, उत्तम वाद-विवाद या गोष्टींची उणीव भास होती, या नव्या खासदारांच्या निमित्ताने ही उणीव कमी भासेल अशी आशा मोदी यांनी एनडीएच्या खासदारांच्या बैठकीत व्यक्त केली.


