शुक्रवार, दिनांक ७ जून २०२४
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारचा अंतिम दिवस होता. शुक्रवारी अखेरच्या दिवसापर्यंत या मतदारसंघातून तब्बल ५३ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी नाशिक विभागीय आयुक्तालयात मोठी गर्दी केली होती.
यांचा उमेदवारात आहे समावेश…
विवेक बिपिनदादा कोल्हे, राजेंद्र एकनाथराव विखे पाटील, पै. डॉ. पानसरे छगन भिकाजी, निशांत विश्वासराव रंधे, राजेंद्र दौलत निकम, दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, कचरे भाऊसाहेब नारायण, अमृतराव रामराव शिंदे, किशोर भिकाजी दराडे, गव्हारे गजानन पंडित, रतन राजनदास चावला, महेंद्र मधुकर भावसार, दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, राजेंद्र दौलत निकम, दिलीप काशिनाथ डोंगरे, अमृतराव रामराव शिंदे, दराडे रुपेश लक्ष्मण, गांगर्डे बाबासाहेब संभाजी, गुळवे संदीप नामदेव, अनिल शांताराम तेजा, कोल्हे सागर रवींद्र, अमोल बाळासाहेब दराडे, रखमाजी निवृत्ती भांड, कोल्हे संदीप वसंत, भास्कर तानाजी भामरे, भागवत धोंडीबा गायकवाड, धनराज देविदास विसपुते, गुळवे संदीप भीमाशंकर, पंडित सुनील पांडुरंग, गुळवे संदीप गोपाळराव (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), अविनाश महादेव माळी, कचरे भाऊसाहेब नारायण, इरफान मो इसहाक, दिलीप बाबुराव पाटील, बोठे रणजीत नानासाहेब, सारांश महेंद्र भावसार, गुळवे संदीप वामनराव, दराडे किशोर भिकाजी (शिवसेना), झगडे सचिन रमेश, महेश भिका शिरुडे, दराडे किशोर प्रभाकर व शेख मुख्तार अहमद यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.


