शुक्रवार दिनांक ७ जून २०२४
१७ व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. लोकसभा निवडणूक पार पडली असून १८ वी लोकसभा अस्तित्वात येत आहे. सर्वात मोठा पक्ष ठरल्याने एनडीएचे (NDA) प्रमुख नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून निमंत्रण देण्यात आले आहे.
राष्ट्रपतींना एनडीच्या नेत्यांचे समर्थन पत्र मिळाले त्यानंतर आता राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान व केंद्रीय मंत्री परिषदेच्या अन्य सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ ९ जून २०२४ ला संध्याकाळी सव्वा सात वाजता देतील.
एनडीए गठबंधनचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या घरी भेट घेतली. यानंतर मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेत त्यांना आपल्या समर्थक खासदारांची यादी सोपवली आणि सरकार बनवण्याचा दावा केला. पाठोपाठ राष्ट्रपतींकडून नरेंद्र मोदी यांना सरकार बनवण्यासाठी निमंत्रित केले गेले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी विविध देशातील मान्यवर उपस्थित राहणार असण्याची शक्यता गृहीत धरून त्या दृष्टीने तयारी केली जात आहे.

