बुधवार, दि. १२ जून २०२४
लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या प्रदेश काँग्रेसच्या सचिवाला निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
प्रदेश काँग्रेस सचीव प्रशांत गावंडे यांच्यावर ही कारवाई प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने करण्यात आली असून त्यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले आहे.
बुधवारी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी पटोले यांच्या आदेशावरून गावंडे यांच्यावर कारवाईचे आदेश काढले आहे.



