बुधवार दिनांक १२ जून २०२४
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे चित्र अस्पष्ट झाले असून निवडणूक रिंगणातून माघार घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १५ जणांनी माघार घेतल्याने आता निवडणुकीच्या मैदानात २१ उमेदवार राहिले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.
बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. निवडणूक घडविण्यासाठी पूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरलेल्या डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महायुतीकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांना संधी देण्यात आली असून ॲड. संदीप गुळवे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. याशिवाय भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहे. निवडणुकीत अपक्षांची संख्या सर्वाधिक आहे.
हे आहेत अंतिम उमेदवार, बघा यादी…
किशोर भिकाजी दराडे (शिवसेना)
ॲड. गुळवे संदीप गोपाळराव (पाटील) (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
ॲड. महेंद्र मधुकर भावसार (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)
भागवत धोंडीबा गायकवाड (समता पार्टी)
अनिल शांताराम तेजा (अपक्ष)
अमृतराव उर्फ अण्णासाहेब रामराव शिंदे (अपक्ष)
इरफान मो. इसहाक (नादिर) (अपक्ष)
कचरे भाऊसाहेब नारायण (अपक्ष)
कोल्हे विवेक बिपिनदादा (अपक्ष)
कोल्हे सागरदादा रवींद्र (अपक्ष)
कोल्हे संदीप वसंतदादा (अपक्ष)
गव्हारे गजानन पंडित (अपक्ष)
गुरुळे संदीप वामनराव (अपक्ष)
झगडे सचिन रमेश (अपक्ष)
दिलीप काशिनाथ डोंगरे (अपक्ष)
आर. डी. निकम (अपक्ष)
पै. डॉ. पानसरे छगन भिकाजी (अपक्ष)
बोठे रणजीत नानासाहेब (अपक्ष)
महेश भिका शिरुडे (अपक्ष)
रतन राजनदास चावला (अपक्ष)
संदीप गुळवे (पाटील) (अपक्ष)



