गुरुवार, दिनांक १३ जून २०२४
बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवार व नणंद सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभूत झालेल्या भावजय सुनेत्रा पवार यांची शुक्रवारी राज्यसभेवर अजित पवार गटाकडून बिनविरोध निवड झाली. यामुळे आता बारामतीच्या नणंद-भावजयीची जोडी एकाच वेळी राजकारणात दिसणार आहे. नणंद सुप्रिया सुळे लोकसभेत तर भावजय सुनेत्रा पवार राज्यसभेत दिसणार आहे.
महायुतीच्या वतीने भाजपाच्या कोट्यातून अजित पवार गटाचा सुनेत्रा पवार यांनी आज दुपारी विधानसभेत जाऊन उमेदवारी अर्ज भरला. पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. परंतु, ३ वाजेपर्यंत सुनेत्रा पवारांशिवाय कोणाचाही अर्ज न आल्याने सुनेत्रा पवारांची बिनविरोध झाली.
सुमित्रा पवार म्हणाल्या, पक्षाने मला राज्यसभेची अधिकृत उमेदवारी दिली आहे, त्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, इतर नेते आणि पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानते. माझ्या उमेदवाराच्या निर्णय पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मिळून घेतला आहे. पक्षात कोणत्याही प्रकारची नाराजी नाही.



