गुरुवार, दिनांक १३ जून २०२४
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी २६ जूनला मतदान होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या मतदान केंद्रातून शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात वीस मतदान केंद्र निर्माण करण्यात आल्याची माहिती निवडणूक शाखेचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली आहे.
सर्वाधिक प्रत्येकी तीन-तीन मतदान केंद्र संगमनेर आणि अहमदनगरमध्ये आहेत. या मतदान केंद्रात सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान पार पाडणार आहे.
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून भाजपाचे विवेक कोल्हे आणि अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांचे अर्ज कायम राहिल्याने महायुतीत बिघाडी झाल्याचे बघावयास मिळाले. कोल्हे यांनी अपक्ष तर भावसार यांनी पवार यांच्या गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय महायुतीचे किशोर दराडे, महाविकास आघाडीचे ॲड. संदीप गुळवे निवडणूक रिंगणात असल्याने या मतदारसंघात चौरंगी लढत बघावयास मिळत आहे.


शिक्षक मतदारांना खालील मतदान केंद्रात मतदान करता येणार असून बघा तालुका निहाय मतदान केंद्रांची यादी…



