Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » … आणि त्यांना कायमचा पत्ता मिळाला “संग्राम नगर” … ॲड. संग्राम जोंधळे यांच्याबद्दलची ही पोस्ट होतेय समाज माध्यमात व्हायरल!
सामाजिक

… आणि त्यांना कायमचा पत्ता मिळाला “संग्राम नगर” … ॲड. संग्राम जोंधळे यांच्याबद्दलची ही पोस्ट होतेय समाज माध्यमात व्हायरल!

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/06/2024Updated:17/06/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, दिनांक १५ जून २०२४

पीडब्ल्यूडीचे अधिकारी, चार जेसीबी, चार ट्रॅक्टर, नगरपालिकेचे चीफ ऑफिसर त्यांचा सर्व स्टाफ संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचा पुरुष व महिला पोलीस स्टाफ, पोलीस व्हॅन हा सर्व लवाजमा अकोले नाका येथे सुमारे चार महिन्यांपूर्वी कोणाच्या तरी सांगण्यावरून पूर्व नियोजन करून आला. म्हाळुंगी नदीच्या गाळपेर क्षेत्रात १९७५ पासून अनेक घरे, वस्ती करून राहतात. कोणी वेल्डिंग काम करतात, महिला धुण्या-भांड्याचे, कोणी गवंडीकाम तर कोणी भंगार गोळा करण्याचे काम करतात. सर्व सामान्य हातावरची माणसं.

सरकारी यंत्रणा आल्यावर त्यांनी घरे पाडण्यास सुरुवात केली. आडवे आलेल्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. सरकारी यंत्रणेपुढे भयभीत होऊन शांत बसलेले लोक, चेहऱ्यावर वेदना होत्या, घर पडल्यावर कुटुंब उघड्यावर पडणार, घरामध्ये लहान मुले, वयस्कर माणसे, काही बाळंतीन स्त्रिया अशा परिस्थितीत कुठे जाणार. हतबल होऊन सर्व नागरिक शांतपणे जेसीबीकडे पाहत होते.

त्यावेळेस एक पत्रकार शानू बेगमपुरे याचा अॅड. संग्राम जोंधळे यांना फोन गेला. फोनवर त्यांनी सांगितले की राजापूर रोड, अकोले नाका येथे घरे पाडण्याचे काम चाललेले आहे. माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचे नाव आले आहे. तुम्हीच हे थांबवू शकता तरी तुम्ही तातडीने आले तर बरं होईल. ही मोहीम थांबवा. त्यावेळेस अॅड. जोंधळे हे आजारी होते. ताप आलेला होता. कोर्टातदेखील गेले नाही. घरीच औषधाची गोळी घेऊन पडलेले होते. परंतु असा फोन आल्यावर आराम करण्यात काहीच अर्थ नाही. वेळ निघून गेल्यावर उपयोग नाही म्हणून त्याही परिस्थितीत ते त्या ठिकाणी गेले.

त्यावेळी बारा घरे पाडून झाली होती. सुमारे ५२ घरे शिल्लक होती. ते पाहिल्यावर अॅड. जोंधळे यांच्या लक्षात आले की कारवाई ही एकतर्फी बेकादेशीरपणे चाललेली आहे. कायद्याची पायमल्ली सरकारी यंत्रणेकडूनच होत आहे. परंतु तातडीने कोर्टात जाणे शक्य नाही. म्हणून तेथील लोकांना आवाज दिला, गोळा केले. एकत्रितपणे तुम्ही लढण्यास तयार आहात का? सर्वांनी एकमुखी हो म्हणून प्रतिसाद दिला.

त्यानंतर सर्व जमाव जेसीबीकडे गेला व जेसीबीला काढून दिले. त्यावेळेस पोलीस निरीक्षक मथुरे यांनी जोंधळे वकिलांना सांगितले की, तुम्हाला जेलमध्ये टाकेल. त्यावेळी अॅड. जोंधळे यांनी सांगितले की, सर्वात प्रथम मला जेलमध्ये टाका. कायद्याप्रमाणे कारवाई होत नसल्याचे प्रशासनाला निदर्शनास आणून दिले. तास दीड तास तणावात गेले. त्यानंतर सरकारी यंत्रणा निघून गेली. तो दिवस अत्यंत तणावात गेला.

त्यानंतर सर्व रहिवाशांना एकत्र करण्यात आले व ही परिस्थिती बदलली पाहिजे. त्यामध्ये संघर्ष सामाजिक संघटनेने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. कालांतराने या रहिवाशांची कागदपत्रे जमा करून मनाई हुकुमासाठी संगमनेर कोर्टात दावा करण्यात आला. मनाई हुकुमासाठीच्या अर्जाचा निकाल होऊन जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते, पोलीस खाते, तहसील इत्यादी विरुद्ध न्यायालयाने या रहिवाशांची घरे पाडू नये म्हणून मनाई करण्यात येत असल्याचा आदेश दिला.

अॅड संग्राम जोंधळे यांनी अत्यंत अडचणीच्या व कठीण प्रसंगात साथ व योग्य मार्गदर्शन दिल्यामुळे आज ५२ घरे त्या ठिकाणी आहेत. येथील रहिवाशांनी एकत्र येऊन पत्ता नसलेल्या या वसाहतीला “संग्राम नगर” हे नाव दिले व कृतज्ञता व्यक्त केली आहे.

या सर्व संघर्षात सागर ढगे, प्राजक्ता ढगे, निजाम रंगरेज, नर्गिस आत्तार, हिना आत्तार, महेंद्र राठोड, लक्ष्मी कतारी, अजय हासे, उमेश पाथरकर, विक्रम कतारी, इरफान पठाण, मुन्ना सय्यद, मीरा राखपसरे, लक्ष्मी भागवत याशिवाय असंख्य स्थानिक रहिवासी तसेच संघर्ष सामाजिक संघटनेचे शहराध्यक्ष दत्ता कांडेकर, मुख्य संघटक नागेशभैय्या रघुवंशी, जिल्हाध्यक्ष केशवराव जाधव, टपरीधारक संघटनेचे अरुण शेटे, धाकतोडे ताई यांनी सहभाग घेतला. आता येथील लोकांचे आरोग्य, स्वच्छता, आर्थिक बचत लहान मुलांचे शिक्षण या विषयावर संघर्ष सामाजिक संघटनेने लक्ष केंद्रित केलेले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4
Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 9,964
संग्राम जोंधळे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.