Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये धडक मशाल मोर्चा

July 22, 2026

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

July 22, 2026

आज, बुधवार २२ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लोकसभा अध्यक्षपदासाठी चंद्राबाबूंचा उमेदवार असेल तर इंडिया आघाडीचा पाठिंबा, शिवसेना नेते संजय राऊत
राजकारण

लोकसभा अध्यक्षपदासाठी चंद्राबाबूंचा उमेदवार असेल तर इंडिया आघाडीचा पाठिंबा, शिवसेना नेते संजय राऊत

भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 16, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार दिनांक 16 जून 2024 

केंद्रात सरकार स्थापन करतेवेळी मोदींना पाठिंबा देताना तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्रबाबू नायडू यांनी लोकसभेचे अध्यक्षपद मागितले होते. चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार दिला तर त्याला आम्ही पाठिंबा देऊ तसेच संपूर्ण इंडिया आघाडीचा पाठिंबा देण्यासंदर्भात इंडिया आघाडीत चर्चा केली जाईल, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमत:च संसदेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून (24 जून) सुरू होत आहे. या अधिवेशनात लोकसभेचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे मोदींना पाठिंबा देताना तेलगू देसमचे नेते चंद्रबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केली होती. मात्र भाजपकडून अध्यक्षपद नायडू यांच्या पक्षाला देण्यात येते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या पार्श्वभूमीवर राऊत यांनी रविवारी (दि. 16 जून) प्रसार माध्यमांशी बोलताना जाहीर केलेल्या भूमिकेमुळे भाजप अध्यक्षपदाचा काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

राऊत म्हणाले, लोकसभेचे अध्यक्षपद अत्यंत महत्वाचे आहे. राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी भाजपाचे एजंट म्हणून काम केले होते. त्यांनी शिवसेनेबाबत ज्या पद्धतीने निकाल दिला आहे, ते पाहिल्यावर सर्व संशयास्पद आहे. शिवसेनेबाबत मिलिंद नार्वेकर यांनी बनावट निकाल दिला. राहुल नार्वेकर पॉलिटीकल एजंट आहे. तसाच निकाल उद्या लोकसभेत भाजपाचा अध्यक्ष झाल्यावर देण्यात येऊ शकतो.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

तसेच, भाजपाकडे लोकसभा अध्यक्षपद गेल्यावर भाजपा सर्वात आधी चंद्रबाबू नायडू, नितीशकुमार यांचा पक्ष फोडतील. यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभेचे अध्यक्षपद मागितले असल्याचे आम्हाला समजले आहे. परंतु भाजपाचा अध्यक्ष झाल्यास चंद्रबाबू नायडू, नितीशकुमार, चिराग पासवान यांचा पक्ष फोडण्यात येईल. कारण भाजपाला ज्या ताटात खाल्ले आहे, त्या ताटात खड्डा खणायची सवय आहे. आम्हाला त्यांचा चांगला अनुभव आहे. म्हणून जर का लोकसभेचे अध्यक्षपद भाजपाकडे गेले, तर घटनाबाह्य पद्धतीने पक्ष फोडण्यात येऊ शकतात, असे राऊतांनी सांगितले.

Advt
anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 489
भाजप संजय राऊत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये धडक मशाल मोर्चा

By अनंत पांगारकरJuly 22, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ​संगमनेर: ​दिल्ली येथे आपल्या विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर…

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

July 22, 2026

आज, बुधवार २२ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.