Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्री थोरात यांनी केले मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांच्या सांत्वन
सामाजिक

आमदार बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्री थोरात यांनी केले मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांच्या सांत्वन

तिन्ही विद्यार्थिनींचा मृत्यू दुर्दैवी घटना: आ. थोरात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, दिनांक १६ जून २०२४

शनिवारी संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथे तीन विद्यार्थिनींचा शेततळ्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे स्पष्ट करत तालुक्याचे लोकप्रतिनिधी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे अध्यक्ष, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी रविवारी मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

शनिवारी शालेय नवीन वर्षाला प्रारंभ झाला. सृष्टी उत्तम डापसे (इयत्ता सहावी, वय- १३ वर्ष), वैष्णवी अरुण जाधव (इयत्ता सहावी, वय १२ वर्ष) आणि अनुष्का सोमनाथ बडे (इयत्ता चौथी, वय १० वर्ष) या शालेय विद्यार्थिनींचा शाळेतून परतून येत असताना गावालगत असलेल्या शेततळ्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत उपस्थित असलेल्या थोरात यांनी या घटनेचे वृत्त कळताच आपल्या यंत्रणेला तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर जयश्री थोरात यांनी देखील स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थांशी संपर्क करत तिन्ही कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे बाळासाहेब थोरात व जयश्री थोरात यांनी मेंढवन येथे जात डापसे ,जाधव व बडे कुटुंबीयांच्या भेटी घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, बाळासाहेब गायकवाड, शेतकी संघाचे संचालक विनायक काळे, संपत काळे, ज्ञानेश्वर काळे आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. शाळेचा पहिला दिवस हा आनंदाचा असतो. या चिमुकल्या विद्यार्थिनी अत्यंत आनंदाने हा पहिला दिवस साजरा करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घातला. ही अकस्मात घटना असून यामुळे सर्वांना मोठे दुःख झाले आहे. शासकीय स्तरावरून या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठीच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहे. – आमदार बाळासाहेब थोरात.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,027
जयश्री थोरात बाळासाहेब थोरात सांत्वन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.