Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 13, 2026

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर, शेकापच्या जयंत पाटलांचाही समावेश, निवडणूक २७ जुलैला
राजकारण

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर, शेकापच्या जयंत पाटलांचाही समावेश, निवडणूक २७ जुलैला

मोर्चे बांधणी सुरू
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 18, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाल २७ जुलै रोजी संपत असल्याकारणाने या जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. तर त्याचदिवशी सायंकाळी मतमोजणी पार पडणार आहे.

विधानसभेच्या आमदारांकडून विधान परिषदेच्या सदस्यांसाठी मतदान होणार असल्याने आणि हे मतदान गुप्त पद्धतीने होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षात या निवडणुकीची चुरस रंगणार आहे. या ११ जणांमध्ये शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचाही समावेश आहे.

विधान परिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाल २७ जुलै रोजी संपत असल्याने या जागांसाठी निवडणूक कधी लागते याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं.

विधानसभेतून निवडून द्यायच्या या जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होणार आहे. याकरता निवडणूक आयोगाकडून २५ जून रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष विधान परिषदेच्या जागांवर लागलं आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आल्याने आघाडीचं मनोबल उंचावलं आहे. राज्यातील १५० पेक्षा अधिक मतदारसंघात महाविकास आघाडीला बढत मिळाली असल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोर आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून केला जात आहे.

यामुळे ही निवडणूक अटीतटीची आणि रंगतदार होणार आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी १० जागा या आमदारांच्या राजीनाम्यामुळे तर ४ जागा या आमदारांच्या निधनामुळे रिक्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये २७४ विधानसभा सदस्यांमधून ११ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांच्या कोट्यामध्ये घट झाली आहे. भाजपा त्यांच्या ५ जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर एकनाथ शिंदे गट अजित पवार गटही प्रत्येकी २ जागांसाठी प्रयत्न करतील.

काँग्रेसचे २ सदस्य जरी निवृत्त होत असले तरी त्यांचा १ सदस्य सहज निवडून येईल. परंतु दुसऱ्या सदस्यासाठी त्यांना अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. शरद पवार गट आणि ठाकरे गट यांच्याकडे स्वबळावर उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांना मतांसाठी जुळवाजुळवी करावी लागणार आहे.

विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये विजय गिरकर (भाजपा), निलय नाईक (भाजपा), रमेश पाटील (भाजपा), रामराव पाटील (भाजपा), महादेव जानकर (भाजपा मित्र पक्ष), अनिल परब (उबाठा गट), मनीषा कायंदे, डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), डॉ. वजाहत मिर्झा (काँग्रेस), अब्दुल खान दुराणी (राष्ट्रवादी अजित पवार गट), जयंत पाटील (शेकाप) या सदस्यांचा समावेश आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 572
विधान परिषद निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJune 13, 20260

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी हा…

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.