Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » डॉ. सुजय दादांनाही ईव्हीएमवर संशय; ईव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या चौकशीसाठी निवडणूक आयोगाला केला अर्ज !
राजकारण

डॉ. सुजय दादांनाही ईव्हीएमवर संशय; ईव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या चौकशीसाठी निवडणूक आयोगाला केला अर्ज !

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/06/2024Updated:20/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, २० जून

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून यांचा २९ हजार ३१७ मतांनी पराभूत झालेल्या माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विखे पाटील यांच्यासह अनेक पराभूत उमेदवारांनी अशा प्रकारचा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला असून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM)आणि वोटर वेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल युनिटची (VVPAT) चौकशी करण्याची मागणी केली.

या संदर्भात इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची चौकशी करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला एकूण १० अर्ज मिळाले आहेत. यातील बहुतांश उमेदवारांनी एक ते तीन ईव्हीएम युनिटच्या पडताळणीची मागणी केली आहे. मात्र, काही उमेदवारांनी यापेक्षा अधिक युनिटची चौकशी करण्याची मागणीही केली. या उमेदवारांना प्रत्येक ईव्हीएम युनिटसाठी ४०,००० रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी भरावा लागेल.

पंतप्रधान मोदींसह बड्या नेत्यांच्या झाल्या होत्या सभा…

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम युनिटची चौकशी करण्याची मागणी केली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश लंके यांनी त्यांचा २८ हजार ९२९ मतांनी पराभव केला आहे. ही निवडणूक राज्यातील महत्त्वपूर्ण लढतीपैकी एक लढत मानली जात होती. विखे यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्यातील भाजपाच्या बड्या नेत्यांनी या मतदारसंघात सहभाग घेतल्या होत्या.

कोण अर्ज दाखल करू शकतात?

लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सर्व २६ एप्रिल २०२४ रोजी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट स्लिप जुळवण्याची याचिका फेटाळली. मतमोजणीनंतर सात दिवसांच्या आत उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त ५ टक्के ईव्हीएम मशीन तपासण्यासाठी देऊ शकता. असे अर्ज केवळ उपविजेते आणि द्वितीय उपविजेतेच दाखल करू शकतात. प्रत्येक ईव्हीएम मशीनच्या पडताळणीसाठी ४० हजार रुपये आणि जीएसटी भरावा लागेल. पडताळणीदरम्यान ईव्हीएममध्ये काही दोष आढळल्यास ही रक्कम उमेदवारांना परत केली जाईल.”

“डॉ. सुजय विखे यांना अद्यापही पराभव मान्य होत नाही. त्यांनी आता तो स्वीकारला पाहिजे. पण विखे कुटुंबाला तसा इतिहास आहे. पूर्वी यशवंतराव गडाख यांच्याबाबतही विखे कुटुंबीय अशाच पद्धतीने वागले होते. आता ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत शंका उपस्थित केली म्हणजे विखे यांनी केंद्रीय यंत्रणांवरच आक्षेप घेतला आहे.” … खासदार नीलेश लंके, अहमदनगर

“जनतेने दिलेला कौल मान्य आहेच. मात्र, अनेक ठिकाणांहून कार्यकर्त्यांच्या शंका आणि तीव्र मागणी होती. त्यामुळे तेथील इव्हीएम-व्हीव्हीपॅट पडताळणी करण्याची मागणी नियमानुसारच निवडणूक आयोगाकडे केली आहे. यात कोणतेही राजकारण नाही. यातून कोणीही वेगळा अर्थ काढू नये.” – माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,207
डॉक्टर सुजय विखे निवडणूक आयोग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.