Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दोन मुलांचा शेततळ्यात टाकून खून करणाऱ्या आईसह तिच्या प्रियकराला पोलीस कोठडी
गुन्हेगारी

दोन मुलांचा शेततळ्यात टाकून खून करणाऱ्या आईसह तिच्या प्रियकराला पोलीस कोठडी

प्रियकराच्या मदतीने मुलांचा काढला काटा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/06/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, २० जून 

दोन मुलांचा शेततळ्यात टाकून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी या मुलांच्या आईसह तिच्या प्रियकराला अटक केली असून दोन्ही आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कविता सारंगधर पावसे व सचिन बाबाजी गाडे अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. तब्बल दोन महिन्यानंतर या खून प्रकरणाला वाचा फुटली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस यंत्रणेवर आंदोलनाच्या माध्यमातून दबाव वाढविल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास करत प्रत्यक्षदर्शीच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळते.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे राम नवमीच्या दिवशी १७ एप्रिल रोजी शेततळ्यात दोन शाळकरी मुलांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र या प्रकरणामागे वेगळीच कारणे असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांनी सखोल तपास करण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांकडून प्रत्यक्षात कोणतेही कार्यवाही होताना दिसत नव्हती.

त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करत पोलीस यंत्रणेवर दबाव वाढविला होता. अखेरीस बुधवारी पोलिसांनी मृत मुलांची आई आणि तिच्या प्रियकराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन गाडे याला बुधवारी अटक करण्यात आली होती. तर गुरुवारी पहाटे गाडे याची प्रेयसी व मृत मुलांची आई कविता पावसे हिला अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,302
पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar15/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्याने…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.