Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/09/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

समृद्धी महामार्गावर गाडी दुरुस्त करणाऱ्या मॅकेनिकला चाकूचा धाक दाखवून मारहाण करत लुटणाऱ्या सराईत दरोडेखोरांच्या टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे दोन साथीदार सध्या फरार आहेत. कोपरगाव ते शिर्डी रस्त्यावरील कोकमठाण शिवारात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, ८ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास राहता तालुक्यातील साकुरी येथील रहिवासी आणि व्यावसायिक मॅकेनिक अभिषेक मच्छिंद्र गायकवाड (वय २०) हे समृद्धी महामार्गावरील पोल क्रमांक ५०८ जवळ एका आयशर कंपनीच्या गाडीची दुरुस्ती करत होते. त्यावेळी तिथे आलेल्या सहा अज्ञात दरोडेखोरांनी फिर्यादी आणि त्यांच्यासोबतच्या साक्षीदाराला चाकूचा धाक दाखवला, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

महामार्गावरील दरोड्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलीस महासंचालक यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करण्यात आला.

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तपासासाठी चार विशेष पथके तयार केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, अनंत सालगुडे, विकास जाधव यांच्यासह पोलीस अंमलदार रणजीत जाधव, अरूण गांगुर्डे, निळकंठ कारखेले, विष्णू भागवत, सोमनाथ झांबरे, विजय पवार, राहुल डोके, प्रकाश मांडगे, मनोज साखरे, बाळासाहेब खेडकर, अमृत आढाव, किशोर शिरसाठ, सुनिल मालणकर, भगवान थोरात, रिचर्ड गायकवाड, महादेव भांड, गणेश धोत्रे, सुनिल पवार, रमीजराजा आतार, अजिनाथ पाखरे, विशाल तनपुरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड आणि भगवान धुळे यांचा समावेश होता.

तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदार आणि समृद्धी महामार्गावरील तब्बल १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची सलग चार दिवस छाननी केली. ११ सप्टेंबर २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली की, हा दरोडा धनु काळे याने त्याच्या साथीदारांसह केला असून ते कोकमठाण शिवारातील पुलाजवळ बसलेले आहेत. त्यानुसार पथकाने पंचांसमक्ष सापळा रचून धनंजय उर्फ धनु प्रकाश काळे (वय २७, रा. भोजडे चौकी, संवत्सर, कोपरगाव), स्वप्नील संतोष भारुड (वय २०, रा. भिमवाडी, कोपरगाव), प्रशांत जालींदर भारुड (वय २०, रा. भिमवाडी, कोपरगाव) आणि शिवरंजन राजेश शिंदे (वय २२, रा. बिरोबा चौक, संवत्सर, कोपरगाव) यांना ताब्यात घेतले.

आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सावळीविहीर येथील चंदू नारायण तहकीक आणि त्याच्या एका अनोळखी मित्राच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरी केलेले २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, २ हजार रुपयांची रोख रक्कम आणि ८० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (क्रमांक MH-17-DP-3213) असा एकूण १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पकडण्यात आलेले आरोपी धनंजय उर्फ धनु काळे आणि स्वप्नील भारुड हे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत. धनु काळे याच्यावर कोपरगाव शहर, लोणी, कोपरगाव तालुका आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, घरफोडी आणि दरोड्याची तयारी यांसारखे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर स्वप्नील भारुड याच्यावर कोपरगाव शहर, संगमनेर तालुका, श्रीरामपूर शहर, घारगाव आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात चोरी, बलात्कार आणि मारहाणीचे सहा गुन्हे दाखल आहेत.

ताब्यातील चारही आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 130
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar12/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समृद्धी महामार्गावर गाडी दुरुस्त करणाऱ्या मॅकेनिकला चाकूचा धाक दाखवून मारहाण…

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.