Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्य सरकारने ८३०५ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, हे आहे कारण…
महाराष्ट्र संवाद विशेष

राज्य सरकारने ८३०५ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, हे आहे कारण…

राज्यातील २४७१० सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 21, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, २१ जून

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी पाठोपाठ निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या राज्यातील ८३०५ सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारने सप्टेंबर अखेर पुढे ढकलल्या आहेत. या अगोदरही वेगवेगळ्या कारणाने सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

२०२४-२०२५ या वर्षात राज्यातील २४७१० सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित असून त्यापैकी राज्यातील ८३०५ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मात्र राज्य सरकारने पावसाळ्यामुळे या निवडणुका ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचा आदेश राज्य शासनाने जारी केला आहे.

गुरुवारी (२० जून) सरकारने काढलेल्या या आदेशात म्हटले आहे की, हवामान विभागाने २०२४ मध्ये सर्वसाधारण पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, १२ जून २०२४ अखेर राज्यातील १४ जिल्ह्यात मागील वर्षाच्या सरासरीच्या १०० टक्के पेक्षा जास्त आणि ५ जिल्ह्यात सरासरीच्या ७० टक्के पेक्षा जास्त पाऊस झाल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे बहुतेक जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणी, पीक लागवड आणि इतर अनुषंगिक शेतीविषयक कामात व्यस्त असल्याने अशा शेतकऱ्यांना ते सभासद असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेऊन राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पावसाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत (३० सप्टेंबर, २०२४) पुढे ढकलणे उचित होईल अशी शासनाची धारणा आहे, असं राज्य सरकारने आदेशात म्हटले आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातील जनतेला आता विधानसभा निवडणुका आणि दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहे. याशिवाय विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या तब्बल आठ हजारावर संस्थांच्या निवडणुकीला राज्य सरकारने पावसाचे कारण देत निवडणुका पुढे ढकलल्या असल्या तरी या अगोदरही वेगवेगळ्या कारणाने सहकारी संस्थाच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात काही राजकीय कारण असावे, अशी शंका सहकार चळवळीत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 730
निवडणूक सहकारी संस्था
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर नजीकच्या आढा ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू!

June 11, 2026

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

By अनंत पांगारकरJune 13, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: सरकार दारूबंदी करणार नाही आणि लोक सहजासहजी दारू सोडणार नाहीत,…

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 13, 2026

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.