Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महसूल मंत्री अधिवेशनात, जिल्ह्यात महसूलचे कर्मचारी आंदोलनात तर कामानिमित्त आलेली जनता वाऱ्यावर
महाराष्ट्र संवाद विशेष

महसूल मंत्री अधिवेशनात, जिल्ह्यात महसूलचे कर्मचारी आंदोलनात तर कामानिमित्त आलेली जनता वाऱ्यावर

महसूल यंत्रणा विस्कळीत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, २८ जून 

राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातील चवरसांगवी (श्रीगोंदा) येथे वाळू तस्करांकडून महसूलच्या पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर जिल्ह्यातील महसूलचे कर्मचारी आंदोलनात उतरले आहे. यामुळे जिल्ह्यात महसूलचे कामकाज बंद पडले असून कामानिमित्त आलेल्या जनतेचे हाल सुरू आहे.

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सध्या मुंबईत अधिवेशनात व्यस्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले असून जिल्ह्यातील महसूल यंत्रणेचे कामकाज बंद पडले असल्याचे दिसते. संगमनेर मध्ये देखील कामानिमित्त आलेले नागरिक तहसील कार्यालयात ताटकळताना दिसत होते. किरकोळ ॲफिडेव्हिटसारखी कामे मार्गे लावण्यासाठी देखील कोणताही अधिकारी दुपारी बारा वाजेपर्यंत तहसील कार्यालयात उपलब्ध नसल्याने नागरिकांचे हाल झाले.

दरम्यान या संदर्भात संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. प्रत्यक्षात तहसील कार्यालयात बाराच्या सुमारास पाहणी केली असता एकही अधिकारी जागेवर नव्हता. नायब तहसीलदारांच्या केबिनची दारेदेखील बंद होती. 

कोणीतरी अधिकारी भेटेल आणि आपले काम होईल या आशेने एरझऱ्या घालताना नागरिक.

नव्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना लागणारी शालेय कागदपत्रे, विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांची फरफट झाली. तर खरिपाचा हंगाम सुरू असल्याने शेती विषयक विविध कारणांसाठी लागणारी महसुली कागदपत्रे काढण्यासाठी आलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा खोळंबा झाला होता. याशिवाय आवश्यक कामांसाठी लागणारे किरकोळ स्वरूपाचे ॲफिडेव्हिटवर सह्या करण्यासाठी देखील कोणताही अधिकारी उपलब्ध होत नसल्याने तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांचे हाल होताना दिसत होते.

एकूणच आंदोलनादरम्यान जिल्हा प्रशासनाची महसूल यंत्रणेवरील पकड सैल झाल्याचे दिसत होते. यामध्ये दूरवरून आलेल्या नागरिकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

काय आहे घटना… आजी माजी महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात श्रीगोंदे तालुक्यातील चवरसांगवी येथे सीना नदीपात्रात शनिवारी रात्री अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर हल्ल्याची घटना घडली. पोलिसांकडून संशयितांना अद्यापही अटक न झाल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यात काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

आंदोलनादरम्यान नागरिकांचे हाल नकोत…

महसूल पथकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संबंधितांवर तातडीने कारवाई होणे अपेक्षित आहे. आरपीआयच्यावतीने देखील या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. अन्यायाविरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलन करणे देखील चुकीचे नाही. मात्र विविध कामांसाठी नागरिक तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून तहसील कार्यालयात येत असतात. दूरवरून आलेल्या या नागरिकांची गैरसोय होणार नाही याची देखील प्रशासनाने दखल घेण्याची आवश्यकता आहे. – कैलास कासार, शहराध्यक्ष, आरपीआय (आठवले)

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 866
आंदोलन महसूल राधाकृष्ण विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.