Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर पालिकेच्या कॉटेज रुग्णालयाच्या गलथान आरोग्य सेवेची शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केली पोलखोल… रुग्णांच्या आरोग्याबाबत सुरू आहे असे काही
सामाजिक

संगमनेर पालिकेच्या कॉटेज रुग्णालयाच्या गलथान आरोग्य सेवेची शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केली पोलखोल… रुग्णांच्या आरोग्याबाबत सुरू आहे असे काही

एका चांगल्या रुग्णालयाचा सुरू आहे बट्ट्याबोळ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/06/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मेडिकल ऑफिसर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करा नाहीतर काळे फासू: अमर कतारी

अनंत पांगारकर | शनिवार, २९ जून 

पालिकेच्या कॉटेज रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा होत असल्याची बाब शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) समोर आणली असून यामुळे येथील आरोग्य सेवेची पोलखोल झाली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या मेडिकल ऑफिसरसह काम चुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

संगमनेरमधील कॉटेज रुग्णालयाची यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा असा प्रकार ठरली आहे. रुग्णांच्या आरोग्याशी खेळण सुरू असून यातून मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. रुग्णांच्या नावानिशी तसेच झालेल्या प्रकारासंबंधी कतारी यांनी तक्रार केली असून यात पुढील दहा दिवसात तात्काळ सुधारणा झाली नाही तर संगमनेरकरांच्यावतीने मेडिकल ऑफिसरसह कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा तसेच कॉटेज रुग्णालयात येण्यास बंदी करण्याचा इशारा दिला आहे.

कॉटेज रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह स्टाफचे रुग्णांशी वागणे अतिशय उर्मटपणाचे आहे. रुग्णालयात आलेल्या रुग्णांची उद्धटपणे बोलत वाईट वागणूक दिली जाते.

नेमकं काय घडलंय…

घटना – १ लहान बालकांना चुकीच्या पद्धतीने एमआर (MR) व बूस्टर डोस चुकीच्या पद्धतीने दिल्याने त्रास झाला आहे. या बालकांना थंडी ताप, हातातून पू येणे, डोस घेतलेल्या जागेवर गाठी तयार झाल्या. त्यामुळे या बालकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करून पालकांना हजारो रुपये खर्च करावे लागले.

घटना – २ एकोणविस वर्षीय तरुणीच्या बाळंतपणावेळी बाळाच्या डोक्यात गाठ असल्याने वाढ होत नव्हती. याबाबत मेडिकल ऑफिसर ने त्यांना कोणतीही कल्पना अथवा माहिती दिली नाही. रुग्णालयात आठव्या महिन्यात बाळ दगावले. शासनाच्या योजनेप्रमाणे गरोदर मातांना पहिली सोनोग्राफी मोफत असते ती नऊ महिन्यात केव्हाही करता येते. मात्र रुग्णालयाच्या मेडिकल ऑफिसरने नऊ महिने झाल्याशिवाय फ्री असलेले सोनोग्राफी करत नसल्याचे सांगत टाळाटाळ केल्याने बाळ दगावले.

घटना – ३ बाळंतपणा दरम्यान महिलेला कॉपर टी बसविण्यात आली मात्र कुटुंब नियोजनाच्या काम पदरम्यान त्या महिलेची प्रॉपर्टी न काढताच तिचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करण्यात आले. तीन महिन्यांनी हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिला उपचारासाठी कधी लोणीला तर कधी खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले.

घटना – ४ याशिवाय रुग्णांना वेळेत उपचार न मिळणे, गरोदर मातांना वेळेवर कॅल्शियम औषध पुरवठा न करणे, सोनोग्राफीची चिठ्ठी न देणे, उद्धटपणे बोलणे, खाजगी रुग्णालयात जाण्यास भाग पाडणे असे प्रकार सर्रासपणे घडत आहेत.

घटना – ५ ओपीडीची वेळ दहा ते अकरा असते त्यानंतर बारा ते एक हॉस्पिटल बंद असते. मात्र रुग्णांकडे लक्ष न देता सर्व स्टाफ आतल्या बाजूला गप्पा मारत बसलेला असतो. तसेच बहुतेक जण निवांतपणे झोपा देखील काढत असतात त्यांच्यावर लक्ष ठेवणारी कोणती यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न निवेदनाद्वारे कतारी यांनी उपस्थित केला आहे.

निवेदन देणाऱ्यात यांचा आहे समावेश… माजी शहर प्रमुख अमर कतारी, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित चव्हाण, अक्षय बिल्लाडे, पप्पू कानकाटे, इम्तियाज शेख, फैसल सय्यद, अमोल डुकरे, अनुप म्हाळस, अक्षय गाडे, त्रिलोक कतारी, शितल हासे, संगीता गायकवाड, वैशाली वडतल्ले, राजश्री वाकचौरे, प्रशांत खजुरे, प्रकाश चोथवे, वेणूगोपाल लाहोटी, दीपक वन्नम, दीपक साळुंखे, विजय सातपुते, राजू सातपुते, पंकज पडवळ, योगेश खेमनर, लखन सोन्नर, गुलाब कोकाटे, सचिन साळवे, संभव लोढा, जयदेव यादव, अनिल खुळे, ब्रह्मा खिडके, रंगनाथ फटांगरे, प्रवीण चव्हाण, जितेंद्र दर्वे, संकेत कोल्हे, सचिन पाववाके, निलेश गुंजाळ, मुस्लिम मावळा अजीज मोमीन, नारायण पवार, सदाशिव हासे, प्रवीण कडलग, सुनील घुले आदी.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,106
अमर कतारी कॉटेज रुग्णालय शिवसेना उद्धव ठाकरे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.