रविवार ३० जून
बँकेच्या भरण्यामध्ये पाचशे रुपयांच्या तेरा बनावट मोठा आढळून आल्याने बँकेच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर (नाशिक) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील हॉस्पिटलमधून मेडिक्लेमचे पैसे भरताना अज्ञात व्यक्तीने या नोटा दिल्याची माहिती समोर येत असून पोलीस तपास करत आहेत.
नाशिकच्या इंदिरानगर परिसरात असलेल्या कोटक महिंद्रा बँकेचे शाखा व्यवस्थापक स्वप्निल सुनील नगरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या शाखेमध्ये सुबोध सुधीर रत्नपारखे (रा. वडाळा-पाथर्डी रोड) हे सकाळी पैशांचा भरणा करण्यासाठी आले. त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या भरण्यात ५०० रुपयांच्या १३ बनावट नोटा असल्याचे निदर्शनास आले. या नोटा त्यांना नगर जिल्ह्यातील अकोले येथील हॉस्पिटलमधून मेडिक्लेमचे पैसे भरताना अज्ञात व्यक्तीने दिल्या होत्या.
नोटा बनावट असल्याचा संशय आल्याने रत्नपारखे व बँकेच्या कॅशियर अंकिता गायकवाड यांनी ही बाब शाखा व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकरणी शाखा व्यवस्थापकांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नोटांची सतत्या पडताळून पाहण्यासाठी त्यांची शहानिशा केली जाणार आहे. देशदूतने यासंदर्भात वृत्त दिल आहे.
★ बँकेत आलेल्या भरण्यात ५०० रुपयांच्या १३ नोटा बनावट असल्याचा बँकेचा दावा आहे. या प्रकरणात सत्यता पडताळून पुढील आवश्यक तपास केला जाईल. – अशोक शेरमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, इंदिरानगर


