Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर संगमनेरात मटक्याला पुन्हा एनओसी, सूत्र जुळले? धंदे जोमात सुरू
पत्रकारिता

अखेर संगमनेरात मटक्याला पुन्हा एनओसी, सूत्र जुळले? धंदे जोमात सुरू

सर्वच अवैध धंदे जोमात सुरू
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 2, 2024Updated:July 2, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार २९ जून

नगर जिल्ह्यातील पोलीस, पोलिसांची पथके यांच्या सततच्या हप्तेखोरीमुळे संगमनेर शहरातले आणि तालुक्यातले मटका अड्डे बंद करण्यात आले असल्याची राळ उठवत छुप्या पद्धतीने आणि मोबाईल ॲपद्वारे साधारण महिनाभर मटका सुरू ठेवल्यानंतर शनिवारपासून नव्या जोमाने धुमधडाक्यात संगमनेर शहर आणि तालुक्यात मटक्याच्या पेढ्या आणि अड्डे सुरू झाले आहेत. पोलीस आणि संगमनेरातल्या मटका किंगमध्ये पुन्हा जुळवाजुळव झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

साधारण महिना भरापूर्वी जिल्ह्यात कुप्रसिद्ध आणि एक नंबरचा अवैध धंदा असणाऱ्या काही मटका चालकांकडून पोलीस आणि पोलीस पथकांच्या होणाऱ्या त्रासामुळे आणि सतत हप्ते वाढवून मागण्याच्या जाचामुळे आम्ही मटका धंदा बंद करत आहोत अशी हवा करण्यात आली होती. मटका बंद केला आहे असे दाखवण्यासाठी काही दिवस मटका पेढ्या आणि टपऱ्या बंद करण्यात आल्या.

मात्र छुप्या पद्धतीने मटका घेणे देणे चालूच होते. त्यामुळे पोलिसांनी देखील मागच्या महिन्याच्या काळात अनेक वेळा संगमनेरात छापेमारी करून शहरातील दोन मटका किंग वर थेट कारवाई केली आणि त्यांना आरोपी केले. हे छापे सातत्याने सुरू होते. महिनाभर हा लपाछपीचा खेळ सुरू होता. परंतु आता सर्व सेटलमेंट झाल्यानंतर मटका पेढ्या पुन्हा सुरू झाल्या आहेत.

गेल्या महिन्याभरात अचानकपणे नगरच्या एलसीबीने संगमनेर शहरात छापे टाकून मटका टपऱ्या चालवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. यामध्ये मटक्याचे मूळ मालकांना देखील आरोपी करण्यात आले. अनेक वेळा पंटर पकडून कारवाई केली जात होती. परंतु अचानक मूळ मालकांना आरोपी करायला सुरुवात झाल्याने ‘कुछ तो गडबड है’ अशी चर्चा शहरात सुरू झाली. त्याचबरोबर संगमनेर शहर पोलिसांनी देखील असे छापे टाकण्यास सुरुवात केली आणि गुन्हे दाखल केले मागच्या एक महिन्याचे सर्व रेकॉर्ड तपासले असता सर्वकाही समोर येईल.

पोलीस अधिकारी आणि पोलिसांच्या पथकाविरुद्ध महिनाभरापूर्वी गळे काढणाऱ्या मटका किंग मंडळींनी पुन्हा एकदा जोमाने संगमनेरात मटका अड्डे सुरू केले आहेत. नेमकं असं काय घडलं आहे. ‘गोलमाल है भाई, सब गोलमाल है, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आता पोलीस पथके, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक कारवाई करतात की नाही यावरून लवकरच सत्य समोर येईल. त्याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.

पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष… संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात अवैध धंद्याचे मुख्य केंद्र म्हणून चर्चेत असलेल्या संगमनेरकडे पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. संगमनेरमध्ये मटक्याबरोबरच, गांजा तस्करी, जुगार अड्डे, अवैध कॅफे हाऊस, गुटखा तस्करी, वाळू तस्करी, गोवंश मांस तस्करी आणि त्याचबरोबर मंगळसूत्र, गंठण चोरांचे वाढते प्रमाण या सर्व बाबींकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. उत्तर नगर जिल्ह्यात संगमनेर असल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांची देखील पथके संगमनेरात नेहमी फिरतीवर असतात. तरीही अवैध धंद्यांचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही, असे एकंदरीत पोलीस रेकॉर्ड वरूनच दिसून येते. या सर्व बाबींची चौकशी पोलीस अधीक्षकांनी एकदा करायला हवी आणि नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी देखील यात लक्ष घालायला हवे अश्या प्रतिक्रिया सर्व सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,753
अवैध धंदे पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

अवैध बांधकाम प्रकरणी अनिकेत इथापेंवर दोन आठवड्यांनंतरही गुन्हा दाखल नाही; संगमनेर नगरपालिकेच्या पत्राकडे पोलिसांचे दुर्लक्ष

June 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.