Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर सभागृहातून पाच दिवसांसाठी निलंबनाची कारवाई
राजकारण

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर सभागृहातून पाच दिवसांसाठी निलंबनाची कारवाई

सत्ताधारी विरोधक सभागृहात आक्रमक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/07/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, २ जुलै 

पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये दानवे यांनी लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत शिवीगाळ केली, असा आरोप भारतीय जनता पार्टीने करत दानवे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.

सोमवारी (१ जुलै) विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार आमने-सामने आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपा आमदार आक्रमक झाले होते. भाजपकडून दानवे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली गेली. त्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं होतं. त्यामुळे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना काही काळ सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलं.

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा आणि माफी मागावी. शिवाय दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासाठी ठराव मांडला होता. या अनुषंगाने उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन केलं आहे. पाच दिवसांच्या या कालावधीत दानवे यांना सभागृहात येता येणार नाही. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याविना सभागृहाचे काम चालेल.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 654
अंबादास दानवे निलंबन पावसाळी अधिवेशन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांदरफळ बुद्रुक गावाच्या शिवारातील बाजारतळावर नवरात्रोत्सवानिमित्ताने…

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.