Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दरवाढीच्या मागणीसाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचा हरीनाम गजर
आंदोलन

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दरवाढीच्या मागणीसाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचा हरीनाम गजर

रामकृष्ण हरी शेतकरी फिरतोय दारोदारी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/07/2024Updated:04/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई | प्रवीण पुरो

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव द्या, या प्रमुख मागणीसाठी पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी  विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/07/VID-20240704-WA0036.mp4

दूध भावाच्या प्रमुख मागणीसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी हातात दुधाची बाटली आणि टाळ घेऊन ‘रामकृष्ण हरी शेतकरी फिरतोय दारोदारी’ असा हरीनाम गजर करत महायुतीच्या सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी महाविकास आघाडीतील अनेक आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शन करताना पाहायला मिळाले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. पावसाळी अधिवेशनात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला भाव मिळत नाही, यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. “दूध भुकटी धोरण, शेतकऱ्यांचे होते मरण”, “अनुदानाची भीक नको, शेतकऱ्यांना द्या हक्काचे दर”, “अनुदानाची कशाला दाखवताय आस, भुकटी आयात करून पाडताय भाव”, “दुधाला नाही दर, सरकार वसूल करते शेतकऱ्यांकडून कर” अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर मिळावा यासाठी महायुती सरकारला विरोधकांकडून घेरण्यात आले.

दुधाला योग्य भाव न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्याला फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकरी लागला दारोदारी सरकार स्वतःचे पोट भरी, दुधाला भाव तरी द्या रे, शेतकरी फिरतोय दारोदारी, सरकार अदानीचे पोट भरी अशी जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी आंदोलन केले.

यावेळी विरोधकांनी हातात टाळ घेत, भजन करत सरकारचा निषेध करण्यात आला. भजनाद्वारे विरोधकांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या यावेळी मांडल्या. विरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून नियमितपणे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहे.

विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला वारंवार घेरण्याचा प्रयत्नही केला. पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी मंगळवारी सत्ताधाऱ्यांनी विशेषतः विधान परिषदेचे भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याविरोधात आंदोलन केले. पण यावेळीही विरोधकांनी संविधानाची प्रत हातात घेऊन सत्ताधाऱ्यांचे आंदोलन हाणून पाडले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 813
आंदोलन दूध दर पावसाळी अधिवेशन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.