Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भारतीय टी ट्वेंटी संघाला राज्य सरकारचे ११ कोटी, शानदार सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा
क्रिडा व कला

भारतीय टी ट्वेंटी संघाला राज्य सरकारचे ११ कोटी, शानदार सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईतील चार खेळाडूंचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

प्रवीण पूरो / मुंबई

विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील मुंबईतील चार खेळाडूंचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी आणि नंतर विधानभवन येथे सत्कार केला. राज्य सरकारच्यावतीने भारतीय टीमला ११ कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळाल्यानंतर सर्व देशवासीयांनी भारतीय संघाचं तोंड भरून कौतुक करत जल्लोष साजरा केला होता. मायदेशी परतल्यानंतर मुंबईत भारतीय संघाचा विश्वचषकासह रोड शो पार पडला. त्यानंतर वानखेडे मैदानावर भव्य कार्यक्रम झाला. संघाला सव्वाशे कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं.

तब्बल ११ वर्षानंतर भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. वेस्टइंडीज आणि अमेरिका येथे नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात भारताने जोरदार कामगिरी करत विश्वचषकावर आपलं नाव कोरल. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवला. बीसीसीच्यावतीने देशभरातून भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांकडून भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक करून ठिकठिकाणी जल्लोष देखील साजरा करण्यात आला होता.

टी ट्वेंटी विश्वचषकासह भारतीय संघ गुरुवारी मायदेशी परतला, गुरुवारी संध्याकाळी बीसीसीआयच्यावतीने भव्य दिव्य कार्यक्रम मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला.

शुक्रवारी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्यावतीने विजेत्या भारतीय संघातील मुंबईतील चार खेळाडूंचा सत्काराचा सोहळा विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडला. त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी, भारतीय संघाचा कप्तान रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव , शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चौघा खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांकडून सत्कार स्वीकारल्यानंतर भारतीय संघाचा कप्तान रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव , शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनाकडे रवाना झाले. तिथे विधानभवनाच्या चौथ्या मजल्यावरील सेंट्रल सभागृहात शानदार सत्कार सोहळा पार पडला. रोहित शर्मासह तिन्ही खेळाडूंनी अगदी थोडक्यात महाराष्ट्राच्या शाबासकीची प्रशंसा केली.

रोहितने राज्याकडून होणारा गौरव कदापि न विसरण्यासारखा असल्याचं म्हटलं. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडेच्या ऐतिहासिक वास्तूला नजरेसमोर ठेवून मुंबईत एक लाख प्रेक्षक संख्या असलेलं स्टेडियम उभारण्याची गरज प्रतिपादन केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरानी नाव कोरावं अशी कामगिरी संघाने केल्याचे कौतुकोत्गार काढले. यावेळी शिंदे यांनी संघाला ११ कोटी रुपये देण्याची घोषणा केली. यावेळी विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भाषणं झाली.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 755
एकनाथ शिंदे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.