Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुंबई अदानींच्या घशात घालून लुटली जात आहे, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार आणि आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप
राजकारण

मुंबई अदानींच्या घशात घालून लुटली जात आहे, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार आणि आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप

सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचे वाभाडे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/07/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

प्रवीण पुरो | मुंबई

राज्याची राजधानी असलेली मुंबई राजरोसपणे लुटली जात आहे. दुग्धविकास विभागाची साडेआठ हेक्टर जागा अदानीच्या घशात घातली जात असल्याचा गंभीर आरोप व मुंबईला अदानीपासून वाचवा. तसेच जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमापुढे केला.

विधानसभेत मुंबईतील जमिनी हस्तांतरणाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बोलताना त्यांनी अदानी कंपनीला मुंबई विकली जात असल्याचा आरोप केला. अदानी पूर्ण मुंबई गिळंकृत करीत असताना अदानीला राज्याचे प्रमुख पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. भाजपाचे नेते याविरोधात सांगत असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

वडेट्टीवार म्हणाले, कुर्ला येथील दुग्धशाळेची साडेआठ हेक्टर जमीन आहे. १० जून २०२४ रोजी एकाच दिवशी पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग ते अदानी यांना हस्तांतरीत केली गेली. हे हस्तांतरण एकाच दिवसात झालं. इतकी तप्तरता कशी? असा सवाल त्यांनी केला. सदर जमिनीचे मूल्यांकन किती आहे? जमिनीवरील एफएसआयचे मुल्याकंन किती होते? जमिनीची किंमत वीस हजार कोटी रुपये होती. तरीही रेडी रेकनरच्या केवळ २५ टक्के दरानं जमीन देण्यात आली.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

जमीन हस्तांतरणासंदर्भात तत्कालीन पशुसंवर्धन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काय शिफारशी केल्या होत्या? तुकाराम मुंढे यांनी दिलेली नोट अनुकूल नव्हती. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सभागृहाला याबाबतची माहिती देण्याची त्यांनी मागणी केली.

राज्यातील खोके सरकारने मुंबई व महाराष्ट्र लुटण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. मुंबईला तोडू शकत नसल्यानं मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईतील दुग्धविकास भूखंडही अदानीला देण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. “धारावी पुनर्विकास प्रकल्पाला आमचा विरोध नाही. तेथील नागरिकांना हक्काची घरे मिळावीत ही आमची इच्छा आहे. मात्र धारावी पुनर्विकासाच्या नावावर नेमका काय पुनर्विकास केला जात आहे, हे सरकारनं स्पष्ट करावं. राज्यात अनेक पुनर्विकास प्रकल्प सुरू असताना केवळ अदानीसाठी वेगळा नियम का लावला जात आहे? याचं उत्तर सरकारनं देण्याची मागणी त्यांनी केली.

धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवताना धारावीतील एक लाख कुटुंबांना अपात्र ठरवण्याची भीती असल्याची माहिती त्यांनी दिली. हा विकास धारावीकरांचा आहे की अदानी समूहाचा आहे? याचा विचार होणे गरजेचे आहे. अदानी समूहाच्या लाभासाठी जीआर काढण्यात आले. हे जीआर, नियम त्वरित रद्द करावेत.

“भाजपाचे आणि मिंधे सरकारचे मालक असलेल्यांच्या घशात या जागा घातल्या जात आहेत. मुंबई त्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. नवीन नियमानुसार मुंबईत टीडीआर विकत घ्यायचा असेल तर प्रथम ४० टक्के टीडीआर अदानी समूहाकडूनच विकत घ्यावा लागेल. त्यामुळं मुंबईचे पैसे, मुंबई महापालिकेला मिळणारे पैसे, गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून सरकारला मिळणारे पैसे अदानी समूहाला मिळतील,” याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आमचा कोणत्याही उद्योगपतीला विरोध नाही. मात्र सध्या ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा भयानक कारभार मुंबई आणि महाराष्ट्रात चालला आहे. मुंबईत सध्या काही टाऊन प्लॅनिंग ऑथॉरिटी कार्यरत आहेत. आमचं सरकार आल्यावर आम्ही मुंबई महापालिकेला टाऊन प्लॅनिंग ऑथॉरिटी करू, असं त्यांनी आश्वासन दिलं.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 397
अदानी आदित्य ठाकरे विजय वडेट्टीवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.