Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अनिल परब यांच्या आक्षेपानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर माघार घेण्याची वेळ
राजकारण

अनिल परब यांच्या आक्षेपानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर माघार घेण्याची वेळ

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/07/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी, मुंबई 

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील विरोधकांच्या कुरबुरी सतत वाढत आहेत. परिणामी उपसभापतींना विचारलेल्या जाबानंतर त्यांनी चक्क माघार घेत स्वतःच केलेली शेरेबाजी तपासून ती कामकाजातून काढून घेण्याचा शब्द विरोधकांना द्यावा लागण्याचे घटना सोमवारी सभागृहात घडली.

उपसभापती गोऱ्हे या सभागृहात विरोधकांना बोलू देत नाहीत, असा आरोप अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधी नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. आठवड्याभरापूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन झाले होते, तेव्हा त्यांनीही असाच आरोप केला होता. सत्ताधाऱ्यांना बोलू दिले जाते, मात्र विरोधकांना बोलण्याची संधी मिळत नाही, असं दानवे यांनी सभागृहात म्हटले होते.

अशातच सोमवारी विधानपरिषदेचे ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार अनिल परब आणि नीलम गोऱ्हे यांच्यात शा‍ब्दिक संघर्ष दिसून आला. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव घेत अनिल परब यांचे निलंबन करण्याचे वक्तव्य केले होते. यासंदर्भात परब यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर नीलम गोऱ्हे यांनी कमीपणा घेतल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईत सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे कामकाज आज अडीच तासात स्थगित करण्यात आले. मात्र कामकाज स्थगित होण्यापूर्वी नीलम गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधताना अनिल परब म्हणाले की, उपसभापती यांनी आमच्याबाबत आक्षेप नोंदवला आहे. उपसभापती यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, तुम्ही सभागृहात गोंधळ घालता, कारण तुम्हाला उद्धव ठाकरे यांना तुम्ही काय काम करता हे दाखवायचं असतं. आता मी तुम्हाला असं म्हणू का, तुम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना तुम्ही किती काम करताय हे दाखवायचं असत म्हणून आम्हाला बोलू देत नाही. असे मी बोललो तर तुम्हाला किती राग येईल? असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला.

परब म्हणाले, मी काय काम करतो हे उद्धव ठाकरे यांना दाखवलं आहे. त्यामुळेच मला चार वेळा त्यांनी आमदार केले आहे. आता हेच जर मी तुमच्याबाबत बोललो तर तुम्हाला किती राग येईल? त्यामुळे तुम्ही तत्काळ माझ्याबाबत जे वक्तव्य केलं आहे, ते सभागृहाच्या कामकाजातून काढून टाका, अशी मागणी अनिल परब यांनी केली.

यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मी तुमच्याविषयी अनावधानाने काही बोलून गेली असेल, तर मी असं काही बोलले आहे का? हे तपासते आणि काढून टाकते. नीलम गोऱ्हेंच्या या वक्तव्याने त्यांनी सामोपचाराची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.

पावसामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित …

दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर व आजूबाजूच्या जिल्ह्यांना रविवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे आज सकाळीपासूनच नोकरदार वर्गाची तारांबळ उडाली. मध्य रेल्वेची वाहतूक सेवा कोलमडली असून याचा फटका अनेकांना बसला आहे. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडल्याने अनेक आमदार हे एक्सप्रेसमध्ये अडकले होते. महत्त्वाची बाब म्हणजे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांनाही या पावसाचा फटका बसला. दोन्ही नेत्यांना रेल्वे ट्रॅकवर उतरत प्रवास करावा लागला. त्यामुळे पावसाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा आणि विधान परिषद सभागृहाचे कामकाज मंगळवारी सकाळी ११ वाजता स्थगित करण्यात आले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 467
अनिल परब डॉक्टर नीलम गोऱ्हे पावसाळी अधिवेशन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची…

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.