Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दंडकारण्यअंतर्गत थोरात कारखान्याने चंदनापुरी घाटामध्ये केले पाच हजार वृक्षांचे रोपण, विविध सहकारी संस्था ११ डोंगरांवर वृक्षारोपण करून करणार संगोपन
सामाजिक

दंडकारण्यअंतर्गत थोरात कारखान्याने चंदनापुरी घाटामध्ये केले पाच हजार वृक्षांचे रोपण, विविध सहकारी संस्था ११ डोंगरांवर वृक्षारोपण करून करणार संगोपन

चंदनापुरी, कऱ्हे आणि कोंची घाटात वृक्षारोपण - दुर्गाताई तांबे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार ११ जुलै | संगमनेर 

ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी ज्येष्ठ नेते, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियाना अंतर्गत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने तालुक्यातील चंदनापुरी घाटामध्ये पाच हजार वृक्षांचे रोपन करण्यात आले आहे. याशिवाय गावागावात, तालुक्यातील तीन घाटांमध्ये व ११ विविध डोंगरांवर सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संगोपन केले जात असल्याची माहिती अभियानाच्या प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली.

कारखान्याच्या वृक्षारोपणावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, रमेश गुंजाळ, प्रा. बाबा खरात, शांताराम कढणे, विजय राहणे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, सामाजिक वनीकरण विभागाचे सचिन लोंढे, स्मिता आठरे, अशोक रहाणे, प्रकाश कोटकर, कैलास सरोदे, बबन सावंत, बाळासाहेब फापाळे, शरद गुंजाळ, शंकरराव ढमक आदींसह कारखान्याचे विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तांबे म्हणाल्या, लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियानाचे हे १९ वे वर्ष आहे. अभियाना अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावागावात मोकळ्या जागेत वृक्षारोपण केले जात आहे. वृक्षारोपणानंतर त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्थानिकांवर देण्यात आली आहे.

विविध सहकारी संस्थांच्या वतीने तालुक्यातील ११ डोंगरांवर देखील वृक्षारोपण केले जात आहे. याशिवाय आमदार थोरात यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील चंदनापुरी, कऱ्हे व कोंची घाटात देखील वृक्षारोपणासह दरवर्षी रस्त्याच्या दुतर्फा रंगीबेरंगी फुलांचे रोपण केले जाते. त्यामुळे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा परिसर नयनरम्य दिसतो. अभियानात नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी ओहोळ यांनी देखील दंडकारण्य अभियाना संदर्भात माहिती दिली. प्रास्ताविक जगन्नाथ घुगरकर यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक बाबा खरात यांनी केले.

रिमझिम पावसात पर्यावरणाची गीत रंगली…

सह्याद्रीच्या रांगेत असलेल्या चंदनापुरी घाटामध्ये हिरवाईचे पांघरून घेतलेले सुंदर डोंगर, रिमझिम पाऊस सुरू असताना प्रा. बाबा खरात यांनी पाऊस व पर्यावरणाची गीते गाऊन वातावरणामध्ये चैतन्य निर्माण केले. यावेळी दुर्गाताई तांबे व इतरांनी या गीतांना साथ देत गाणी म्हणत, हाती टिकाव खोरे घेऊन विविध ठिकाणी वृक्षारोपण केले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 658
दंडकारण्य अभियान दुर्गाताई तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची…

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.