Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » येरे येरे पावसा, संगमनेरमधून जाणाऱ्या आणि नव्यानेच झालेल्या कोल्हार-घोटी मार्गावर खड्डे आणि पाणीच पाणी
पत्रकारिता

येरे येरे पावसा, संगमनेरमधून जाणाऱ्या आणि नव्यानेच झालेल्या कोल्हार-घोटी मार्गावर खड्डे आणि पाणीच पाणी

पावसाने ठेकेदाराची केली पोलखोल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/07/2024Updated:15/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार १५ जुलै

संगमनेर शहरातून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गाचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्णत्वास गेल्याने हा मार्ग अतिशय चांगला झाला, हा समज संगमनेरात सध्या सुरू असलेल्या पावसाने खोटा ठरविला असून यामुळे ठेकेदाराच्या कामाची पोलखोल झाली आहे. यामुळे सरकारचा या कामावरील पैसा पाण्यात गेला आहे.

संगमनेरमधून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गाला बाह्यवळण मार्ग मिळाल्यानंतर त्या पाठोपाठ संगमनेरमधून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गाचेही काम झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी रुंद झाला होता. मात्र या रस्त्याच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट राहिल्याने वारंवार धुळीचा सामना करावा लागत होता. त्यातच आता पावसाळा सुरू झाल्याने वर्षभराच्या आतच या रस्त्याच्या कामाचे प्रगती पुस्तकच समोर आले आहे.

या कामावर सरकारचा कोट्यावधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला असल्याचे स्पष्ट होत असून पंचायत समिती ते समनापुर गणपती दरम्यान आणि त्यापुढेही रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले असून या खड्ड्यात पाणी साचून अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे रस्ता अनेक ठिकाणी उखडला असल्याचे दिसते.

विशेष म्हणजे रस्त्याच्या कामासोबतच दुतर्फा साईड गटारीचे काम करणे आवश्यक होते. यामुळे रस्त्यावर शासनाने पाणी वाहून जाण्यास मदत झाली असती. मात्र प्रत्यक्षात अशा प्रकारचे कोणतेही काम करण्यात आले नसल्यामुळे रस्त्यावर असणाऱ्या पाण्याने रस्ता उघडण्यास सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या कामावर रस्त्याच्या दुतर्फा साईड गटारीचे काम का झाले नाही असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. ठेकेदाराच्या प्रत्यक्ष कामात या कामाचा समावेश होता की नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या जीवाची थोडीशी जाण असेल तर त्यांनी रस्त्याच्या या कामात तातडीने लक्ष घालने गरजेचे बनले आहे.

संगमनेरमधील काही जागरूक नागरिकांनी यासंबंधीची छायाचित्रे ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला पाठवत यावर प्रकाश टाकण्याचे आवाहन केले होते. बघा यासंबंधीची छायाचित्रे…

नव्याने झालेल्या कोल्हार-घोटी मार्गाची अवस्था
रस्त्यावर पडले मोठमोठाले खड्डे

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,285
कोल्हार घोटी मार्ग कोल्हार घोटी रस्ता
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.