Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘अच्छे दिन’ची विझणारी शेगडी!
पत्रकारिता

‘अच्छे दिन’ची विझणारी शेगडी!

सर्वसामान्यांच्या दृष्टीने 'अच्छे दिन' संपून आता महागाईच्या 'दुर्दिन'ची सुरुवात झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

‘अच्छे दिन’ची विझणारी शेगडी!

संपादकीय:-
जागतिक घडामोडींचे कारण पुढे करत केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’च्या लाभार्थ्यांना दिलेल्या अनुदानित गॅस सिलिंडरच्या संख्येत ९ वरून थेट ४ वर कपात केली आहे. आधीच महागाईच्या वरवंट्याखाली भरडल्या जाणाऱ्या सामान्य आणि गरीब कुटुंबांच्या जखमेवर हा निर्णय म्हणजे मीठ चोळण्यासारखाच आहे. निवडणुकीच्या काळात ‘अच्छे दिन’ आणि ‘सबका साथ, सबका विकास’च्या घोषणा देणाऱ्या सरकारच्या या धोरणामुळे सर्वसामान्यांच्या घरातली शेगडी पेटणार कशी, असा संतप्त सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.
उज्ज्वला योजनेची सुरुवात २०१६ मध्ये झाली, तेव्हा वर्षाला १२ अनुदानित सिलिंडर दिले जात होते. गेल्या वर्षी हा कोटा ९ वर आणला गेला आणि आता तो थेट ४ वर मर्यादित करण्यात आला आहे. म्हणजेच एका गरीब कुटुंबाला वर्षातील केवळ ४ महिनेच हक्काचे अनुदानित इंधन मिळणार, उर्वरित ८ महिने त्यांना बाजारभावाने महागडे सिलिंडर खरेदी करावे लागणार. प्रति सिलिंडर ३०० रुपये अनुदानाची थेट बँक खात्यात जमा होणारी रक्कम आकर्षक वाटत असली, तरी सिलिंडरची संख्याच अर्ध्याहून अधिक कमी केल्यामुळे या सुविधेचा मूळ उद्देशच मोडीत निघाल्याचे स्पष्ट दिसते.
सरकारने या निर्णयामागे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आणि विस्कळीत झालेली जागतिक इंधन पुरवठा साखळी याचे कारण दिले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर भडकल्याने अनुदानाचा खर्च वाढला, हे आर्थिक गणिताच्या दृष्टीने पटणारे असले, तरी त्याचा संपूर्ण भार थेट गरिबांच्या खिशावर टाकणे कितपत न्याय्य आहे? नुकतेच ७ जून रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ झाली. तीन महिन्यात घरगुती गॅस सुमारे तब्बल शंभर रुपयांनी महागला. त्यातच व्यावसायिक गॅसच्या दरातही ४२ रुपयांची वाढ झाली असून, गेल्या पाच महिन्यांत १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरचे दर तब्बल दुप्पट म्हणजेच १५८० रुपयांवरून ३११३.५० रुपये झाले आहेत. याचा थेट फटका हॉटेलिंग आणि खाद्यपदार्थांना बसून सर्वसामान्यांचे जगणे असह्य झाले आहे.
धूरमुक्त भारताचे स्वप्न दाखवून गरिबांच्या हातात गॅस कनेक्शन तर दिले, पण आता तो गॅस भरण्याची ताकदच सामान्यांमध्ये उरलेली नाही. एका बाजूला ‘इंधनाचा जपून वापर करा’ असे आवाहन करायचे आणि दुसऱ्या बाजूला थेट अनुदानालाच कात्री लावायची, ही विरोधाभासी भूमिका आहे. गॅस सिलिंडरच्या या दरवाढीमुळे आणि अनुदानात झालेल्या प्रचंड कपातीमुळे ग्रामीण भागातील महिला पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे आणि धुराकडे वळण्याची भीती निर्माण झाली आहे.
आर्थिक संकट आणि जागतिक तणावाचा मुकाबला करताना सरकारने कॉर्पोरेट क्षेत्राला सवलती देण्याऐवजी गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेणे थांबवले पाहिजे. जर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला केवळ ४ सिलिंडर मिळणार असतील, तर सर्वसामान्यांच्या दृष्टीने ‘अच्छे दिन’ संपून आता महागाईच्या ‘दुर्दिन’ची सुरुवात झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करून गरिबांना दिलासा देणे गरजेचे आहे, अन्यथा हा धूर आगामी काळात राजकीय वातावरणातही पसरल्याशिवाय राहणार नाही.
अनंत पांगारकर

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 321
उज्वला योजना गॅस दरवाढ गॅस सिलेंडर कपात संपादकीय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

अवैध बांधकाम प्रकरणी अनिकेत इथापेंवर दोन आठवड्यांनंतरही गुन्हा दाखल नाही; संगमनेर नगरपालिकेच्या पत्राकडे पोलिसांचे दुर्लक्ष

June 19, 2026

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

June 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

संगमनेर: तहसील, प्रांत, दिवाणी व जिल्हा न्यायालय आणि अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विजय…

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.