Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जयंत पाटलांच्या पराभवाने महाविकास आघाडीत नाराजीची धग, पवारांच्या शब्दालाही उद्धव ठाकरे किंमत देत नसल्याने संताप
राजकारण

जयंत पाटलांच्या पराभवाने महाविकास आघाडीत नाराजीची धग, पवारांच्या शब्दालाही उद्धव ठाकरे किंमत देत नसल्याने संताप

नार्वेकर यांच्या नावाने बारावा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानेच शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/07/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत सेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांच्या नावाने बारावा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानेच शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालंय. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले होते. मात्र मिलिंद नार्वेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा उद्धव ठाकरेंचा हट्ट त्यांनी अखेरपर्यंत सोडला नाही. हीच जयंत पाटील यांच्यासाठी ती धोक्याची घंटा ठरली. अशात शरद पवार यांनी जयंत पाटील यांना पूर्ण पाठिंबा दिला असला तरी, उद्धव ठाकरे यांचा जयंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होता, अशी चर्चा आता समोर आलीय.

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या विरोधात जयंत पाटील यांनी प्रचार केल्याचा उद्धव ठाकरे यांना संशय आहे. म्हणून त्यांनी जयंत पाटील यांच्या उमेदवारीस विरोध केला, असं बोललं जातं. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेक वेळा फोन केले होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी त्या फोनला उत्तर दिलं नाही अशी सुद्धा माहिती समोर येत आहे.

मिलिंद नार्वेकर यांच्या विजयासाठी काँग्रेसकडून ज्या आमदारांचा पाठिंबा भेटण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना देण्यात आला होता. त्यामध्ये हिरामण खोसकर, मोहनराव हंबर्डे, सुलभा खोडके, शिरीष चौधरी आणि कुणाल पाटील या आमदारांच्या नावांचा समावेश होता. परंतु या आमदारांची मतं फुटतील अशी भीती उद्धव ठाकरे यांना होती. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गट पुरस्कृत शेकापचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा यावरून काँग्रेसमध्ये सुद्धा दोन गट पडले होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे शेकाप उमेदवार जयंत पाटलांच्या बाजूने मत देण्याच्या भूमिकेत होते. यामुळं मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीला धोका निर्माण झाला होता. याच दरम्यान विधान परिषद निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री मुंबईतील हॉटेल इंटर कॉन्टिनेन्टलमध्ये काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली.

ठाकरे सेना जयंत पाटील यांच्या विरोधात या निवडणुकीत कट रचत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. यावरून या बैठकीत तीव्र संघर्ष बघायला भेटला. महाविकास आघाडी निवडणुकीवरून निर्माण झालेला संघर्ष शिगेला पोहोचला होता. अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, के सी पाडवी, सुरेश वरपूडकर, शिरीष चौधरी, मोहनराव हंबर्डे, हिरामण खोसकर आणि सहसराम कोरोटे हे सात जण उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्या समर्थनार्थ मत देतील असा प्रस्ताव अंतिम करण्यात आला.

इतके होऊन सुद्धा ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची २२ मतं मिळाली आणि २३ मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना शेवटपर्यंत झगडावे लागले. काँग्रेसच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांवर त्यांचा विजय झाला आणि शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. जयंत पाटील यांचा झालेला पराभव हा शरद पवार यांच्यासह काँग्रेसच्याही जिव्हारी लागला असून महाविकास आघाडीतील ही धुसफूस लवकर संपणारी नाही.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 890
महाविकास आघाडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची…

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.