Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण हे मानवतेचे काम, दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची मोठी लोकचळवळ ठरली: आमदार बाळासाहेब थोरात
सामाजिक

पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण हे मानवतेचे काम, दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची मोठी लोकचळवळ ठरली: आमदार बाळासाहेब थोरात

पेमगिरीतून १९ व्या दंडकारण्य अभियानास प्रारंभ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
महाराष्ट्र संवाद न्यूजच्या वाचकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

बुधवार, १७ जुलै

पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण हे मानवतेचे काम आहे. ही वसुंधरा अधिक समृद्ध करण्यासाठी पर्यावरण व संवर्धनाच्या या लोक चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करत सर्वांच्या सहभागामुळे दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची मोठी लोकचळवळ ठरली असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचा १९ व्या वर्षाचा शुभारंभ आज पेमगिरीच्या चंदनगड येथून थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अभियानाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, रणजीतसिंह देशमुख, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, अनिल थोरात, उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, २००६ मध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्य अभियान सुरू केले. दरवर्षी कोट्यावधी बियांचे रोपण केले. लक्षावधी वृक्षांचे रोपण केले. कमी पाऊस आणि जास्त उन्हाळा यामुळे वृक्ष संवर्धनावर परिणाम होतो. मात्र तरीही मागील एकोणावीस वर्षांमध्ये तळेगाव भागासह उघडे बोडके डोंगर आता झाडांमुळे हिरवेगार दिसू लागले.

कोळवाडे येथील फादर हर्मन हिल, खांडगाव, पिंपळगाव कोंझिरा, चंदनापुरी, देवगड या ठिकाणांमधील डोंगरही वृक्षारोपणामुळे सहलीचे ठिकाणे ठरत आहेत. तालुक्यामध्ये वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे. झाडे जपणे ही आता लोकचळवळ झाली आहे.

डॉ. तांबे म्हणाले, आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारातील विविध संस्थांनी तालुक्यातील वेगवेगळे डोंगर निश्चित केले असून त्यावर वृक्षारोपण व संवर्धन सुरू आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दिलेली ही पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी आपल्या सर्वांना पुढे न्यायची आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी अधिक सहभाग घ्यावा असे आवाहन केले

दुर्गाताई तांबे म्हणाल्या, संगमनेर तालुका हा सह्याद्रीच्या पायथ्याशी असून तालुक्यातील विविध डोंगरांवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. आता डोंगर हिरवेगार दिसू लागल्याने संगमनेर तालुक्याची ओळख हरित तालुका म्हणून आगामी काळात होईल असा विश्वास व्यक्त केला.

निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत विद्यार्थ्यांसह आषाढी एकादशी साजरी…

आषाढी एकादशीच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या हिरव्यागार डोंगरांच्या सानिध्यात पेमगिरी गावातील चंदनगड येथे वृक्ष संवर्धन दिंडी काढून विविध अभंग गात वृक्षारोपण केले. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम पथक व पारंपारिक पोशाखात सादर केलेले नृत्य आणि गायलेली अभंग याचबरोबर पर्यावरण संवर्धनाची गीते यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 662
दंडकारण्य अभियान दुर्गाताई तांबे बाळासाहेब थोरात सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची…

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.