Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाडक्या बहिणींनंतर लाडक्या भावासाठी  सरकारची स्टायपेंड, सात लाख कोटींच्या कर्जानंतर पैसा आणणार कुठून?
राजकारण

लाडक्या बहिणींनंतर लाडक्या भावासाठी  सरकारची स्टायपेंड, सात लाख कोटींच्या कर्जानंतर पैसा आणणार कुठून?

अंदाजे १० हजार कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त अतिरिक्त भार येणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/07/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
महाराष्ट्र संवाद न्यूजच्या वाचकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

विशेष प्रतिनिधी / मुंबई

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या पाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी आता ‘लाडका भाऊ योजने’ची घोषणा केलीय. मात्र ‘लाडका भाऊ योजने’मुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणली. राज्यभरातून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तर गाव-खेड्यात या योजनेचा अर्ज दखल करण्यासाठी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. या योजनाची राज्यभरात सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असताना, आता विद्यार्थ्यांसाठी ‘लाडका भाऊ’ योजना राज्य सरकारनं आणली आहे. या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे केली आहे.

एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना आणि राज्यावर सात लाख हजार कोटी रुपयांचं कर्ज असताना आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि मतांसाठी महायुती सरकारकडून योजनांची आणि घोषणांची खैरात वाटली जात आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना या योजनांसाठी पैसे सरकार आणणार कुठून, असा सवाल  केला जात आहे. त्यातच आता ‘लाडका भाऊ योजना’ सरकारने आणली आहे. या योजनेसाठी पैसा कोणाकडून घेणार? कुठून आणणार? हे पण सरकारने सांगावे, असाही संतप्त सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.

ही योजना जे युवक अप्रेंटीशीप करत आहेत, त्यांच्यासाठी आहे. आधीच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या योजनेमुळे वर्षाला राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त ४७ हजार कोटींचा खर्च येणार आहे. दुसरीकडे ‘लाडका भाऊ’ योजनेमुळेदेखील वर्षाला अंदाजे १० हजार कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त अतिरिक्त भार येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण योजनेत ४६ हजार कोटीचा खर्च येणार असला तरी राज्य सरकारने प्रत्यक्ष आतापर्यंत केवळ २५ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. योजनेतील १८ ते ३५ वयोगटातील विद्यार्थ्यांची आकडेवारी समोर आलेली नाही. त्या आकडेवारीनुसार १० हजार कोटीपेक्षाही अतिरिक्त भार राज्यावर येऊ शकतो, असं अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी म्हटलं आहे. हे सरकार केवळ मतांसाठी आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केवळ घोषणाबाजी करत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

महायुती सरकार राज्यात आल्यापासून सरकारने राज्यात विविध योजना राबवल्या आहेत. मुख्यमंत्र्याकडून वारंवार हे सरकार गरीब, महिला, विद्यार्थी, कष्टकरी, शेतकरी आणि जनसामान्यांचे असल्याचं सांगतात. राज्याच्या तिजोरीत पैसे नसताना मुख्यमंत्री एवढी मदतीची घोषणा कशी काय करत आहेत? असा प्रश्न आता सामान्य लोकांना पडला आहे. ‘लाडका भाऊ योजना’ काय आहे, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील १२ वी पास झालेल्या तरुणांना प्रत्येक महिन्याला ६ हजार रुपये, डिप्लोमा तरुणाला ८ हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला १० हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय.

या तरुणांना वर्षभरासाठी कोणत्याही व्यवसायात अथवा कारखान्यात प्रशिक्षणार्थी म्हणजेच अप्रेंटीशीप करण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर त्या ठिकाणी त्याला मिळालेल्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर तो अन्य ठिकाणी नोकरी करू शकेल. त्याचे कौशल्य वाढू शकेल. त्यामुळे राज्यातील तरुणांना १ वर्ष काम करण्याची संधी आणि त्यांच्या खात्यात त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पैसे जमा होतील, असा सरकारचा प्रयत्न राहणार आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,008
अजित पवार एकनाथ शिंदे लाडका भाऊ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची…

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.