Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पाच हजाराची लाच भोवली, जिल्हा न्यायालयाने तलाठ्याला दिली ही मोठी शिक्षा…
न्यायालय

पाच हजाराची लाच भोवली, जिल्हा न्यायालयाने तलाठ्याला दिली ही मोठी शिक्षा…

न्यायालयाच्या निर्णयामुळे लाचखोरांना चपराक
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 18, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार १८ जुलै 

शेत जमिनीचा फेरफार मंडल निरीक्षकांना सांगून प्रतिवादीच्या नावावर न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणे तलाठ्याच्या अंगलट आले आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात तलाठ्याविरुद्ध आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने विविध कलमांतर्गत अनुक्रमे तीन व दोन वर्ष कारावासाची आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

उत्तमराव पांडुरंग तांबे असे शिक्षा झालेल्या तलाठ्याचे नाव असून त्याच्या विरोधात उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८/२०११ कलम ७, १३(१)(ड) सह १३(२) ला.प्र. अधिनियम, सन १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लाच लुचपत विभागाच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी भोसले यांनी या प्रकरणाचा तपास करत न्यायालयात आरोपी विरुद्ध आरोप पत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी धाराशिवचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. १) राजेश गुप्ता यांच्यासमोर झाली. गुप्ता यांनी यासंदर्भात आज गुरुवारी निर्णय दिला.

या खटल्यातील तक्रारदाराचे शेत गट नं. १०२ क्षेत्र २ हेक्टर २ आर शेत जमिनीचा फेरफार प्रतिवादी वसंत नरवडे यांचे नावे मंडळ निरीक्षक यांना सांगुन न करण्यासाठी यातील धाराशिव तालुक्यातील आंबेवाडीसह अतिरिक्त कार्यभार असलेल्या कामेगाव, रुईभरचे तलाठी उत्तमराव पांडुरंग तांबे याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी करून ती लाच पंचासमक्ष स्वीकारताना आरोपीला पकडण्यात आले होते.

न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील श्रीमती जोशी यांनी तर आरोपीच्यावतीने ॲड. मिलिंद पाटील यांनी काम बघितले. सरकार पक्षाचा आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर समोर आलेल्या पुरावे, साक्षींच्या आधारे न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी आरोपीला दोषी ठरविले.

लाचखोर आरोपी उत्तमराव तांबे याला न्यायालयाने कलम ७ नुसार तीन वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवस कारावास, कलम १३(१)(ड) व १३(२) नुसार दोन वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,616
न्यायालय लाच लुचपत शिक्षा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राजेंद्र गडगे याला न्यायालयाचा दिलासा; गंभीर गुन्ह्यांत मिळाला नियमित जामीन

May 29, 2026

नसरापूर हत्याकांड: ६५ वर्षीय नराधमाभोवती कायद्याचा फास आवळला; कोर्टात रोज …

May 28, 2026

सापळा रचला, रंगेहात पकडलं… मग लाचखोराने थेट धावत्या गाडीतूनच फेकले पैसे

May 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

By अनंत पांगारकरJune 4, 20260

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय…

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.