Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खासदार निलेश लंकेंच ठरलं… नगर एलसीबीविरोधात सोमवारपासून जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयासमोर उपोषण
महाराष्ट्र संवाद विशेष

खासदार निलेश लंकेंच ठरलं… नगर एलसीबीविरोधात सोमवारपासून जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयासमोर उपोषण

पोलीस दलाची नाचक्की
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 20, 2024Updated:July 20, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

खासदारांच्या एलसीबी विरोधातील लेटर बॉम्बकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठांचे दुर्लक्ष

अहमदनगर पोलीस दलात नेमकं काय सुरू आहे? एलसीबीला नेमका आशीर्वाद कोणाचा?

एलसीबीतील हप्तेखोरांची नावानिशी तक्रार करून अद्यापही दखल नाही

शनिवार २० जुलै | अनंत पांगारकर 

अहमदनगर पोलीस दलातील विशेषत: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील (एलसीबी) भ्रष्टाचारा विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे खासदार निलेश लंके यांनी एका पत्राद्वारे तक्रार करून देखील आठवडा उलट झाला तरी दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे सोमवारपासून (२२ जुलै) लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे स्पष्ट केले.

अहमदनगर एलसीबीच्या विरोधात थेट लोकप्रतिनिधी असलेल्या खासदारानेच उपोषण करण्याची वेळ आल्याने जिल्हा पोलीस दलाची सर्वत्र नाचक्की झाली आहे. अनेक तक्रारी पाठोपाठ खासदारांच्या ‘लेटर बॉम्ब’नंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस दलात मोठे फेरबदल करतील. विशेषतः एलसीबीमध्ये मोठ्या प्रमाणावर खांदेपालट होईल अशी अपेक्षा होती. मात्र पोलीस दलात कोणतेही फेरबदल न झाल्याने या कर्मचाऱ्यांना नेमका आशीर्वाद कोणाचा आहे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

एलसीबीच्या भ्रष्टाचाराविरोधात अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पोलीस महासंचालक व पोलीस दलातील वरिष्ठांना पत्र पाठवत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी गेल्या आठवड्यात ११ जुलैला केली होती.

आठवडाभरात कारवाई न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर पुराव्यांसह उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी या पत्रात दिला होता. सामान्य माणसांच्या तक्रारीची दखल न घेणारे सरकार एका खासदाराच्या पत्राचे दखल घेऊन कारवाई करेल अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली आहे.

सहकाऱ्यांसह उपोषणासाठी बसण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या खासदार लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मंडप व लाऊड स्पीकरसाठी परवानगीची मागणी केली आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी गुरुवारी पोलीस अधीक्षकांना पाठविले आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराबाबत दि. ११ जुलै रोजी एका पत्राद्वारे अवगत करण्यात आले होते. परंतू त्याची अद्यापपर्यंत कुठलीही दखल घेतली गेली नाही, किंवा संबंधितांवर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आपण व आपले सहकारी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक सोपान गोरे व इतर कर्मचारी हे राजरोसपणे हप्ते घेत आहेत. हप्ते गोळा करण्याकामी रविंद्र आबासाहेब कर्डीले व त्यांचे सहकारी त्यांना मदत करत आहेत. रविंद्र कर्डीले यांची शिर्डी येथील साई मंदीर सुरक्षा विभागात नेमणूक असतानाही तात्पुरत्या स्वरूपात त्यांची सायबर सेल नगर येथे बदली करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल या दोन्ही अस्थापना वेगवेगळया असून दोन्ही विभाग स्वतंत्र असताना या शाखांचा कार्यभार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडे देण्यात आला आहे. आहेर यांच्याकडे दोन्ही शाखेचा कार्यभार हा फक्त आर्थिक लोभापाई असल्याचा आरोप खा. लंके यांनी पत्रात केला आहे.

जिल्हयामध्ये बीफ मटन, ऑनलाईन क्लब, वाळू, गुटखा, दारू, गांजा, चंदन तस्करी हे व्यवसाय तसेच मटका, बिंगो हे व्यवसाय पोलीसांच्या आशिर्वाद आणि आश्रयाखाली मोठया प्रमाणावर सुरू आहे. या प्रकरणाचा मास्टर माईंड रविंद्र कर्डीले असून त्यांच्यावर यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेत असताना लाचलुचपत अन्वेशन शाखेने कारवाई केलेली आहे. हा खटला जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे. नगर शहरातील एका गुन्हयामध्ये राज्य गुन्हे अन्वेशन शाखेमार्फत चौकशी सुरू असल्याचेही या पत्राद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले.

यांच्यावर केले हप्तेखोरीचे आरोप… एलसीबी चे पोलीस निरीक्षक दिनेश आहेत, उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्यासह रवींद्र आबासाहेब कर्डिले, शहाजी आढाव, अमोल भोईटे, रणजीत जाधव, रोहित मिसाळ, विजय ठोंबरे, शिवाजी ढाकणे, सचिन आडबल, मनोज गोसावी, बापू फोलाने हप्ते गोळा करण्यासाठी मदत करत असल्याचे लंके यांनी पत्रात म्हटले आहे.

★★★★★

दुसऱ्या पत्रात पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या स्थगित ठेवण्याची केली मागणी…

मागील वर्षी प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे. या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जोपर्यंत उपोषण स्थगित होत नाही, तोपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या तात्पुरत्या स्थगित कराव्यात असेही खा. लंके यांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या दुसऱ्या पत्रात सुचित केले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,213
उपोषण एलसीबी निलेश लंके पोलीस अधीक्षक भ्रष्टाचार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर नजीकच्या आढा ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू!

June 11, 2026

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

By अनंत पांगारकरJune 13, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: सरकार दारूबंदी करणार नाही आणि लोक सहजासहजी दारू सोडणार नाहीत,…

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 13, 2026

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.