Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाजपा व समितीचे काम उत्कृष्ट सुरू असल्यामुळे यशोधनला जाणाऱ्यांची संख्या घटल्याने काही नेते व्यथित : अमोल खताळ
राजकारण

भाजपा व समितीचे काम उत्कृष्ट सुरू असल्यामुळे यशोधनला जाणाऱ्यांची संख्या घटल्याने काही नेते व्यथित : अमोल खताळ

लाभार्थ्यांना पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते मंजुरी आदेश देणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार २१ जुलै 

तालुक्यातील लाभार्थ्यांना यापूर्वी प्रकरणे करण्यासाठी होणारा त्रास, दलालांपासून मुक्ती, दरमहा खात्यावर पैसे जमा, सन्मानजनक वागणूक, अडचणी येणाऱ्याच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे आज लोकांची ओढ वाढली असून, भाजपा व समितीचे काम उत्कृष्ट सुरू असल्यामुळे यशोधनला जाणाऱ्यांची संख्या घटल्यामुळे काही नेते व्यथित झाल्याचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी म्हटले आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दि. १० मार्च २०२४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना संजय गांधी निराधार योजना समिती अशासकीय सदस्य नियुक्तीबाबत शिफारस केली होती. परंतु लोकसभा, शिक्षक विधानपरिषद निवडणुक आचारसंहिता सुरु झाल्याने समिती नियुक्ती प्रलंबित राहिली होती. आचार संहिता संपल्यानंतर समिती अध्यक्ष अमोल खताळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून समिती तात्काळ जाहीर करण्याची विनंती केली केली. पाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांनी ११ जुलैला समिती नियुक्ती जाहीर केली.

अशासकीय सदस्य नियुक्ती झाल्यानंतर अध्यक्ष खताळ यांनी तहसिलदार यांच्याशी चर्चा करून १३ जुलै रोजीच पत्र काढून बैठक १८ जुलैला घेण्याचे ठरविले होते. अध्यक्ष, समिती सर्व सदस्य, तहसिलदार बैठक सुरु झाल्यानंतर आमदाराची मुलगी निवेदन देण्यासाठी तहसिल कार्यालयात आली असता बैठक सुरु असल्याने तहसिलदार यांनी नायब तहसिलदार यांना निवेदन स्वीकारण्यास सांगितले. परंतु तहसीलदारांनीच निवेदन स्वीकारावे असा हट्ट त्यांनी धरला, अर्धा तास थांबावे लागल्याचे दु:ख झाल्याच्या नैराश्यातून आमदाराच्या भावाने पत्रक काढून प्रशासकीय दिरंगाईच्या नावाखाली राजकीय संधी साधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला व बैठक आमच्यामुळेच झाली असे भासविण्याचा पराक्रम केला.

महायुती व पालकमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनाचे काम लोकाभिमुख, पारदर्शी सुरू असून माझी नियुक्ती झाल्यापासून विखे यांच्या सूचनेनुसार योजनेचे प्रकरण मंजूर करताना राजकीय निकष न लावता शोषित, पिडीत, वंचित घटकांना न्याय देण्याचे काम आम्ही करत आहे. स्थानिक आमदार मंत्री असताना त्यांच्या कालावधीमध्ये सहा सहा महिने लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होत नव्हते. विखे यांच्यामुळे दरमहा पाच तारखेच्या आत प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा होत असल्याने ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण असते. लाभार्थ्यांना पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते मंजुरी आदेश देणार असल्याचे खताळ यांनी म्हटले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 738
अमोल खताळ संजय गांधी निराधार योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.